महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

झारखंडच्या धनबादमध्ये युवकानं आपल्या कुटुंबातील तिघांची हत्या करून केली आत्महत्या - धनबादमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धनसार पोलीस स्टेशन परिसरातील गांधी नगरमध्ये एका मुलाने त्याच्याच कुटुंबातील तीन सदस्यांचा खून केला. त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या केली. मुलाने आपल्या आई आणि सावत्र पित्यासह भावाला धारदार शस्त्राने वार करून ठार केले.

झारखंड
झारखंड

By

Published : Jun 14, 2021, 1:15 PM IST

धनबाद (झारखंड) -धनसार पोलीस स्टेशन परिसरातील गांधी नगरमध्ये एका मुलाने त्याच्याच कुटुंबातील तीन सदस्यांचा खून केला. त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या केली. मुलाने आपल्या आई आणि सावत्र पित्यासह भावाला धारदार शस्त्राने वार करून ठार केले. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मुन्ना सिंह यांच्या घरात मुन्ना यादव भाड्याने राहत होते. जवळच ईश्वर साव यांच्या मिक्स्चर फॅक्ट्रीत काम करायचे. अचानक त्यांच्या घराच्या दारातून बाहेर रक्त येताना लोकांनी पाहिले आणि त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना मुन्ना यादव, मीना यादव आणि रोहित यादव यांचे मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत खोलीत आढळले. रोहित यादव याचा मृतदेह पलंगावर पडला होता.

झारखंडच्या धनबादमध्ये युवकानं आपल्या कुटुंबातील तिघांची हत्या करून केली आत्महत्या..

मीना यादवने मुन्ना यादव यांच्याशी दुसरे लग्न केले होते. राहुल यादव हा मीनाच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे, तर रोहित मुन्नाचा मुलगा आहे. लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलचा सावत्र पिता, भाऊ आणि आई यांच्यासोबत कोणत्यातरी कारणावरून वाद सुरू होता. या वादातूनच राहुलने सावत्र वडील मुन्ना आणि सावत्र भाऊ रोहित आणि आई मीना यांना धारदार शस्त्रांनी ठार केले. त्यानंतर त्याने स्वत:चा गळा कापून आत्महत्या केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details