महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Etawah Road Accident: उत्तरप्रदेशात भीषण रस्ता अपघात.. 4 ठार, 42 जखमी, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

Etawah Road Accident: इटावा जिल्ह्यात शनिवारी रात्री आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर बस-डंपरची धडक Bus hit the dumper झाली, ज्यात ४ जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी 42 जण जखमी झाले. या अपघातावर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री योगी यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 4 died in road accident

4 DIED IN ROAD ACCIDENT IN ETAWAH OF UTTARPRADESH
उत्तरप्रदेशात भीषण रस्ता अपघात.. 4 ठार, 42 जखमी, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

By

Published : Oct 23, 2022, 10:18 AM IST

इटावा (उत्तरप्रदेश): Etawah Road Accident: उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील आग्रा-लखनौ एक्सप्रेसवेवर शनिवारी रात्री भीषण रस्ता अपघात झाला, ज्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी 42 जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, देवरिया आणि गोरखपूरहून अजमेर शरीफला जाणारी बस डंपरला Bus hit the dumper धडकली. अपघातावेळी बसमध्ये 46 प्रवासी होते. मुख्यमंत्री योगी यांनी या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दिवंगत आत्म्याला शांती लाभो हीच कामना करतानाच, शोकाकुल कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. 4 died in road accident

जखमींना तातडीने रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवरिया, गोरखपूर येथून अजमेर शरीफला जाणाऱ्या एआर ०६१३ बी ४७२१ या बसमध्ये ४६ प्रवासी होते. दुपारी तीनच्या सुमारास बस पुढे जाणाऱ्या डंपरला धडकली. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बस देवरिया आणि गोरखपूरहून राजस्थानमधील अजमेर शरीफला जात होती.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सैफई पोलीस स्टेशन अंतर्गत आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर दुपारी ३ वाजता हा अपघात झाला, ज्यामध्ये ४२ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना सैफई वैद्यकीय विद्यापीठात उपचारासाठी पाठवण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच डीएम अवनीश कुमार राय, इटावाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जयप्रकाश सिंह घटनास्थळी पोहोचले आणि माहिती घेतली. अधिकाऱ्यांनी पीजीआय सैफई येथे पोहोचून जखमींची भेट घेतली आणि डॉक्टरांना जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले. सर्व प्रवासी आणि जखमींना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस ज्या डंपरला धडकली. त्यात मोरंग भरले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी पोहोचले आणि मदत आणि बचावकार्य सुरू केले.

ABOUT THE AUTHOR

...view details