बिदर/दावणगेरे (कर्नाटक) :राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आचारसंहिता लक्षात घेता पोलीस चेकपोस्टवर वाहनांची तपासणी केली जात आहे. बिदर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात ३० चेक पोस्ट स्थापन करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातून येणार्या प्रत्येक वाहनाला चेकिंग करून सीमेवर प्रवेश दिला जात आहे. गुरुवारी पोलिसांनी वानमरपल्ली चेकपोस्टवर मोठ्या प्रमाणात चांदीच्या वस्तू जप्त केल्या आहेत. कागदपत्रांशिवाय नेत असलेली एक कोटी पन्नास हजार रुपयांची चांदीची या वस्तू आहेत. हे सर्व पोलिसांनी जप्त केले आहे.
66 किलो अप्रमाणित चांदीचे साहित्य जप्त: सुमारे आठ पोत्यांमध्ये 140 किलोपेक्षा जास्त वजनाचे चांदीचे दागिने होते. कार मालकाने याबाबत योग्य माहिती न दिल्याने पोलिसांनी चांदीचे दागिने जप्त करून एफआयआर नोंदवला आहे. अनिल, गजानन आणि राहुल यांच्याविरुद्ध औराद पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम आणि चांदीचे दागिने महाराष्ट्रातून कोणत्याही नोंदीशिवाय राज्यात येत आहेत.