बल्लारी (कर्नाटक):कांपली तालुक्यातील ऐतिहासिक स्थळ असलेल्या गांडुगली कुमारराम किल्ल्यावर संवर्धनाच्या कामात ३९ प्राचीन तोफगोळे सापडले आहेत. पुरातत्व संग्रहालय आणि हेरिटेज विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. विजयनगर राजवटीत ८०० वर्षांपूर्वी वापरण्यात आलेले हे तोफगोळे आहेत. गडाच्या माथ्यावर मातीचे 39 तोफगोळ्या होते. याचे संकलन करुन लोकांना पाहण्यासाठी ते कमलापूर पुरातत्व संग्रहालयात पाठवण्यात आले आहेत.
बल्लारी किल्ल्यात सापडलेले ३९ प्राचीन तोफगोळे शिवाजी महाराजांचे वडिल शहाजींच्या काळातील
कांपली तालुक्यातील ऐतिहासिक स्थळ असलेल्या गांडुगली कुमाररामा किल्ल्यावर संवर्धनाच्या कामात सापडलेल्या प्राचीन तोफगोळ्यांचे परीक्षण करण्यात आले. त्यावरुन शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे विजापूरच्या आदिल शाहीमध्ये कार्यरत होते. त्यांच्या काळातील असल्याचे दिसते, असे गंगावठी येथील इतिहास संशोधक डॉ. शरणबसप्पा कोळकर यांनी सांगितले.
घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. 17 व्या शतकात विजयनगर साम्राज्यावर आक्रमण करणाऱ्या विजापूरच्या आदिल शाहीने कांपलीचा किल्ला ताब्यात घेतला. शिवाजी महाराजांचे वडील शाहजी राजे, जे आदिलशाहीच्या सैन्याचे सेनापती होते. त्यांनी विजापूरच्या राजांकडून जहागीर म्हणून कांपलीचा किल्ला घेतला होता.
बल्लारी किल्ल्यात सापडलेले ३९ प्राचीन तोफगोळे शिवाजी महाराजांचे वडिल शहाजींच्या काळातील पुढे शहाजी राजांनीे किल्ल्याजवळच वास्तव्य केले. त्यावेळी दारूगोळा साठवला असावा. कारण विजापूरची आदिलशाही ही सर्वात जास्त वापरली जाणारी तोफ होती. संरक्षण मोहिमेचा एक भाग म्हणून येथे दारुगोळा साठवला गेला होता अशी माहिती मिळत असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - Congress criticizes VK Singh : सेवानिवृत्ती पुढे ढकलण्यासाठी न्यायालयात जाणारे आज काय सांगत आहेत