कोलकाता ( पश्चिम बंगाल ) : मिथुन चक्रवर्ती यांच्या वक्तव्यावरून पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप झाला आहे. तृणमूल काँग्रेसचे किमान ३८ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा अभिनेता आणि भाजप नेते मिथुन यांनी केला ( Mithun Chakraborty on tmc mlas ) आहे. यातील २१ आमदार थेट आपल्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रानंतर भाजपने पश्चिम बंगालमध्ये ऑपरेशन लोटस सुरु केले तर नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे. ( Operation Lotus In West Bengal )
मग घाबरता कशाला : मिथुन चक्रवर्ती यांनी पत्रकार परिषदेत हा दावा केला आहे. त्यांनी टीएमसी नेत्यांवर ईडीच्या छाप्यांचा बचाव केला. जर कोणी चुकीचे केले नसेल तर त्यांनी घाबरू नये असे ते म्हणाले. भाजपच्या मुस्लीमविरोधी प्रतिमेवर अभिनेते म्हणाले की, हे पूर्णपणे चुकीचे आहे. असे असते तर आज 18 राज्यांमध्ये भाजपची सरकारे नसती, असे मिथुन म्हणाले. भाजप जर मुस्लिमविरोधी असती तर देशातील तीन मोठे स्टार सलमान, शाहरुख आणि आमिर यांना यश मिळाले नसते, असेही ते म्हणाले. पण हे सर्व शक्य आहे.
मिथुनचा दावा खोटा :तृणमूलने त्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की अभिनेता “खोटे दावे करून लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करीत आहे”. टीएमसीच्या खासदार डोला सेन म्हणाल्या की, दादा चांगले अभिनेते आहेत, ते चांगले अभिनय करतात.