महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

परभणी : ठेकेदाराने मध्य प्रदेशच्या 37 मजुरांना ठेवलं ओलिस - मजुरांना ठेवलं ओलिस

मजुरांना बंधक बनवून त्यांच्याकडून काम करून घेतल्याचा प्रकार महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यात समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच छतरपुर पोलिसांनी परभणी जिल्हा गाठत मजुरांची सुटका केली आहे.

परभणी
परभणी

By

Published : Feb 17, 2021, 9:56 PM IST

छतरपुर (मध्यप्रदेश) - मध्य प्रदेशच्या छतरपुर जिल्ह्यातील मजुरांना बंधक बनवून त्यांच्याकडून काम करून घेतल्याचा प्रकार महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यात समोर आला आहे. छतरपूर जिल्ह्यातील जवळपास 37 मजूर महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामध्ये कामाच्या शोधात गेले होते. तेथील ठेकेदाराने त्यांना बंधक बनवले होते. या घटनेची माहिती मिळताच छतरपुर पोलिसांनी परभणी जिल्हा गाठत मजुरांची सुटका केली आहे.

महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात मजुरांना ओलिस ठेवल्याची घटना

सर्व मजूर छतरपुर जिल्ह्यातील बक्सवाहा ठाण्याअंतर्गत भागातील रहिवासी आहेत. या मजुरांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. मजुरांनी आपल्या कुटुंबीयाना फोन कॉलच्या माध्यमातून याची माहिती दिली. मजुरांच्या नातेवाईकांनी पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहचवलं. तातडीने पाऊल उचलत छतरपुर एसपी सचिन शर्मा यांनी एक पोलीस दल महाराष्ट्रात पाठवले आणि मजुरांची सुटका केली. मजुरांना परत छतरपूरला आणण्यात येत आहे. गुरवारी सांयकाळपर्यंत ते छतरपूरला पोहचतील.

संबधित घटना -

बीड जिल्ह्यात मध्य प्रदेशच्या काही कामगारांना ओलिस ठेवल्याची घटना समोर आली होती. एका स्वयंसेवी संस्थेने पोलिसांच्या मदतीने 19 कामगारांची सुटका केली. तसेच कोल्हापूरमध्येही मजुरांना ओलिस ठेवल्याची घटना समोर आली होती. कामगार विभागाने त्यांची सूटका केली.मध्य प्रदेशच्या दमोह येथून जवळपास 14 मजूर आपल्या 5 मुलांसह कामाच्या शोधात महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरात आले होते. मात्र, ठेकेदाराने त्यांना ओलिस ठेवले. तसेच जबरदस्तीने मारहाण करून अतिरिक्त कामे करून घेतली. या मजुरांमध्ये 8 पुरुष, 6 महिला आणि 5 मुले होती.

ABOUT THE AUTHOR

...view details