महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

DDC Elections : जम्मू काश्मीरमध्ये पाचव्या टप्प्यात 51.2 टक्के मतदानाची नोंद - जम्मू काश्मीर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लेटेस्ट न्यूज

जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. आज पाचव्या टप्प्यात 51.2 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. निवडणुकीचे आणखी तीन टप्पे अद्याप बाकी आहेत.

जम्मू काश्मीर
जम्मू काश्मीर

By

Published : Dec 10, 2020, 7:43 PM IST

श्रीनगर -जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असून आज (गुरुवारी) पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले. 37 जागांवर झालेल्या पाचव्या टप्प्यातील जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत 51.2 टक्के मतदान झाले. निवडणुकीचे आणखी तीन टप्पे अद्याप बाकी आहेत.

एकूण 37 मतदाससंघापैकी 20 जागा या जम्मूत तर 17 जागा या काश्मीरमध्ये आहेत. पाचव्या टप्प्यात आज 8 लाख मतदारांनी 299 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला केला आहे. डीडीसी निवडणुकीसह सरपंच पदासाठी 58 जागांवर आणि पंचायत समितीच्या 218 जागांवर आज मतदान झाले.

आठ टप्प्यात मतदान -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा 28 नोव्हेंबर, दुसरा टप्पा 1 डिसेंबर, तीसरा टप्पा 4 डिसेंबर तर चौथा टप्पा 7 डिसेंबर आणि पाचवा टप्पा 10 डिसेंबर म्हणजेच आज पार पडला. तसेच सहावा टप्पा हा 13 डिसेंबर, सातवा टप्पा 16 डिसेंबर आणि आठवा टप्पा 19 डिसेंबर पार पडेल.

राज्यातील प्रमुख 6 पक्ष एकत्र -

जम्मू काश्मीरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राज्यातील प्रमुख 6 पक्ष एकत्र निवडणूक लढत आहे. कलम 370 हटवण्यात आल्यानंतर राज्यातील नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स, सीपीआय (एम), अवामी नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू-कश्मीर पीपल्स मूव्हमेंट हे पक्ष 'गुपकर अलायन्स' म्हणून एकत्र निवडणूक लढत आहे. यामध्ये भाजपा आणि काँग्रेसचे उमेदवार मैदानात आहेत. सद्य परिस्थितीनुसार राज्यात गुपकर अलायन्स काश्मीरमध्ये मजबूत आहे. तर भाजपाची जम्मूवर पकड आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details