महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केंद्रीय मंत्रिमंळात उच्च पदवी असलेले ३६ मंत्री; २ माजी आयएएस, ४ डॉक्टर, ८ वकील - Jyotiraditya M Scindia

पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात कार्डिओलॉजिस्ट्स, स्त्रीरोगतज्ज्ञ, सर्जन आणि जनरल प्रॅक्टिशनरचा समावेश केला आहे. पश्चिम बंगालमधील बानकुरा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे सुभाष सरकार हे स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.

36 highly learned professionals
केंद्रीय मंत्रिमंळात उच्च पदवी असलेले ३६ मंत्री

By

Published : Jul 8, 2021, 5:11 PM IST

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यावसायिक पदवी असलेल्या ३६ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. यामध्ये २ माजी आयएएस अधिकारी, ८ वकील, ४ डॉक्टर, ४ एमबीए पदवीधारक आणि काही अभियंत्यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातील पाच राज्यमंत्र्यांना केंद्रीय मंत्रीपदी बढती दिली आहे. त्यांच्याकडे नवीन मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरविस्तारात जुन्या १२ मंत्र्यांना वगळण्यात आले आहे. तर नवीन सात महिला मंत्र्यांचा समावेश केला आहे.

हेही वाचा-नवीन केंद्रीय मंत्रिमंडळात 'या' सात नवीन महिला मंत्र्यांचा समावेश

  • अश्वनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे आणि दूरसंचार व माहिती मंत्रालयाची जबाबदारी सोपविली आहे. ते १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहे. ५० वर्षीय माजी अधिकारी असलेल्या वैष्णव यांच्या प्रतिष्ठित असलेल्या व्हॉर्टटोन स्कूल आणि पेनिसिलिव्हिनिया विद्यापीठाची एमबीए पदवी आहे. त्यांनी आयआयटी कानपूरमधून एमटेक पूर्ण केले आहे. त्यांनी १५ वर्षे आयएएस अधिकारी म्हणून कामकाज करताना पायाभूत क्षेत्रातील विकासासाठी सार्वजनिक खासगी सहभागाचे मॉडेल तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एनडीएचा २००४ मध्ये पराभव झाल्यानंतर वैष्णव यांची अटलबिहारी वाजपेयी यांची खासगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
  • दुसरे माजी आयएएस अधिकारी रामचंद्र प्रसाद सिंह हे मूळचे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील आहेत. प्रशासन ते राजकारण असा प्रवास झालेले रामचंद्र प्रसाद हे बिहारमधून राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांनी संयुक्त जनता दलातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती.
  • भाजपचे राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य एम. सिंदिया यांनी स्टॅनफॉर्ड विद्यापीठात व्यवस्थापनात शिक्षण घेतले आहे. तर हॉवर्ड विद्यापीठातून बी. ए. पूर्ण केले आहे. ते संसदेत पाचव्यांदा जाणार आहेत. केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदी सिंदिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झालेले राजीव चंद्रशेखर हे इलिनोईस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एमटेक कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर हॉवर्ड विद्यापीठामधून अॅडव्हान्सड मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले आहे. राजीव हे कर्नाटकमधून राज्यसभेचे खासदार आहेत. ते तिसऱ्यांदा खासदार झालेले आहेत.

हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळ खाते वाटप; जाणून घ्या, नवीन मंत्र्यांकडे कोणते सोपविले मंत्रालय

पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात कार्डिओलॉजिस्ट्स, स्त्रीरोगतज्ज्ञ, सर्जन आणि जनरल प्रॅक्टिशनरचा समावेश केला आहे. पश्चिम बंगालमधील बानकुरा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे सुभाष सरकार हे स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. ते एम्स कल्याणीच्या संचालक मंडळावर आहेत. त्यांनी कोलकाता विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी मिळविली आहे.

हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात 'या' राज्यमंत्र्यांना मिळाली बढती

ABOUT THE AUTHOR

...view details