अलिगड -उत्तरप्रदेश मधील अलिग़ड जिल्ह्यात विषारी दारू (Poisonous Liquor) पिल्यामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील गॅस बाटलिंग प्लांटचे चालक आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेतील १४ जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांच्यावर जेएन मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुरुवारी संध्याकाळी सुरू झालेला हा सिलसिला अजूनही थांबवण्याचे नाव घेत नाही आहे. यात अंडला येथील एचपी बॉटलिंग प्लांटवरील टॅक्टर चालकासह ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ही संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा रुग्णालय व मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असलेल्या १४ जणांची परिस्थिती गंभीर आहे. अलिगढ जिल्ह्यातील ठाना लोधा, खैर, जवां, टप्पल, पिसावा या भागातील नागरिकांनी ही विषारू दारू खरेदी केलेली आहे. विषारू दारू पिल्यामुळे मृत्यू पावलेल्या लोकांमध्ये लोधा परिसरातील करसुआ, निमाना, अंडला और हेवतपुर गावांचा समावेश आहे. काही लोक हे अद्यापही बिमार आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी अवहाल मागवला -
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणाची माहिती घेतली असून आरोपीवर सक्त कारवाई करत एनएसए व संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिली आहेत. आतापर्यंत ४ सरकारी दारू विक्री केंद्रे सील करण्यात आले आहे. तर याबाबत जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. १५ दिवसात याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी डीपी पाल यांच्याकडून चौकशी अवहाल मागवला आहे.