तेजपूर32 Myanmar Immigrants Arrested :मणिपूर पोलिसांनी बुधवारी मणिपूरमधील भारत-म्यानमार सीमेवर विशेष कारवाईत 32 म्यानमार स्थलांतरितांना अटक केलीय. अटक केलेल्या स्थलांतरितांपैकी 10 जणांना पुढील तपासासाठी हेलिकॉप्टरनं इंफाळला नेण्यात आलंय, तर इतर 22 जणांना मोरे पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे, असं मणिपूर पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.
सुरक्षा दलांची मोठी कारवाई : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (मोरेह) उपविभागीय पोलीस अधिकारी सिंगथम आनंद कुमार यांची मंगळवारी गोळी मारून हत्या करण्यात आली होती. कुमार मंगळवारी सकाळी मोरे येथील हेलिपॅडच्या साफसफाईची देखरेख करत असताना स्नायपरनं त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर मणिपूर पोलीस, केंद्रीय सुरक्षा दलाच्या एका पथकानं बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास मोरेह मॉर्निंग मार्केट कॉलनी, आसपासच्या परिसरात कारवाई केली.
मणिपूरच्या सीमावर्ती भागात (मोरेह) उपविभागीय पोलिस अधिकारी, चिंगथम आनंद कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाई करत 32 बेकायदेशीर म्यानमार स्थलांतरितांना अटक केली. 32 पैकी दहा जणांना पुढील चौकशीसाठी हेलिकॉप्टरनं इम्फाळला नेण्यात आलं, तर उर्वरित 22 जणांना मोरे पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं. - मणिपूर पोलीस