महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाटण्यात 3 वर्षांची मुलगी बेपत्ता; भाडेकरूने मुलीला विकल्याचा कुटुंबाचा आरोप - पाटण्यात 3 वर्षांची मुलगी बेपत्ता

बिहारमधील पाटणा येथे एका तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या मुलीची त्यांच्या घरात राहणाऱ्या भाडेकरूने 500 रुपयांना विक्री केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सध्या तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पाटण्यात 3 वर्षांची मुलगी बेपत्ता
पाटण्यात 3 वर्षांची मुलगी बेपत्ता

By

Published : Jun 26, 2022, 1:07 PM IST

पटना (बिहार) -राजधानी पाटण्यातील पीरबहोर पोलीस स्टेशन परिसरातून तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिची विक्री केल्याची घटना समोर आली आहे. नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करत तपास सुरू केला. या प्रकरणाच्या तपासानंतर तीन वर्षांच्या निष्पाप मुलीला विकणाऱ्या वृद्ध महिलेसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ताब्यात घेतलेल्या महिलेने पोलिसांना सांगितले की, 3 वर्षांच्या मुलीला तिचा 7 वर्षांचा मुलगा पाटणा जंक्शन येथे घेऊन आला होता. त्यानंतर जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 जवळ उपस्थित असलेल्या एका तरुणाने मुलीला बिस्कीट खायला देण्याच्या बहाण्याने दुसरीकडे नेले, ज्याची तिला माहिती नाही. याप्रकरणी मुलीचे वडील आतिफ आझाद यांचे म्हणणे आहे की, 22 जूनच्या संध्याकाळपासून त्यांची मुलगी बेपत्ता आहे. दरम्यान, भाडेकरूच्या 7 वर्षांच्या मुलाने त्यांच्या मुलीला 500 रुपयांना विकले आहे असा आरोप केला आहे.

प्रत्यक्षात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक नऊ ते सात वर्षांचा मुलगा एका निष्पापाचा हात पकडून त्याला सोबत घेऊन जात असल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी त्या मुलाची चौकशी केली आणि त्यानंतर त्याच्या मागावरुन एका वृद्धाला कारबिघिया स्थानकातून अल्पवयीन मुलांसह पकडले. पोलिसांनी त्यांची कडक चौकशी केली असता आणखी एका महिलेचे नाव समोर आले. यानंतर पोलिसांनी पाटणाच्या पोस्टल पार्क परिसरात छापा टाकला आणि तेथून एका तरुणीला अटक केली. ज्याची पिरभोर पोलीस चौकशी करत आहेत.

त्याच वेळी, गुन्हा दाखलकेल्यानंतर, पोलीस घटनास्थळी आणि आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची छाननी करत आहेत. अद्यापपर्यंत निर्दोषांची सुटका झालेली नाही. त्याचवेळी पीरबाहोर पोलीस स्टेशनचे प्रभारी सबी-उल-हक यांनी सांगितले की, लेखी तक्रार करण्यात आली आहे, ताब्यात घेतलेल्या सर्वांची चौकशी सुरू आहे. परंतु, अद्यापपर्यंत मुलीच्या विक्रीची पुष्टी झालेली नाही.

हेही वाचा -शेतकरी कर्जमुक्ती योजना फसवी, राजू शेट्टींचा आरोप; सरकार विरोधात मोर्चा काढण्याचा दिला इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details