महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

3 Pakistani militants killed : क्रेरी भागात दहशतवाद्यांबरोबर सुरक्षा दलाची चकमक; ३ पाकिस्तानी दहशतवादी ठार, एक पोलीस शहीद - 3 Pakistani militants killed

जम्मू-काश्मीर पोलिसांचा एक जवान शहीद झाला, असे पोलिसांनी ( JK Police martyred in keeri area ) सांगितले. प्राथमिक अहवालानुसार, दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यांसह काही स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे.

दहशतवाद्यांबरोबर सुरक्षा दलाची चकमक
दहशतवाद्यांबरोबर सुरक्षा दलाची चकमक

By

Published : May 25, 2022, 1:17 PM IST

Updated : May 25, 2022, 1:29 PM IST

बारामुल्ला- उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील क्रेरी भागात नजीभात क्रॉसिंगवर ( encounter between security forces and militants ) बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन पाकिस्तानी दहशतवादी ठार ( 3 Pakistani militants killed in Kreeri area ) झाले.

जम्मू-काश्मीर पोलिसांचा एक जवान शहीद झाला, असे पोलिसांनी ( JK Police martyred in keeri area ) सांगितले. प्राथमिक अहवालानुसार, दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यांसह काही स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे.

परिसराला सुरक्षा दलाचा वेढा-पोलीस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने परिसराला वेढा घातला. दहशतवाद्यांच्या उपस्थितीत विशिष्ट माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर ही चकमक झाली. दहशतवादी लपून बसले होते त्या ठिकाणी सुरक्षा दल पोहोचले. तेव्हा दहशतवाद्यांकडून जोरदार गोळीबार झाला आणि चकमक सुरू झाली. प्रत्युत्तरात तीन दहशतवादी ठार झाले आहेत.

Last Updated : May 25, 2022, 1:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details