गंगटोक - पूर्व सिक्कीममध्ये बुधवारी लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारा ट्रक घाटात पडल्याने तीन सैनिक ठार झाले तर तीन गंभीर जखमी झाले.
लष्कराचा ट्रक 600 फुट दरीत कोसळला; तीन जवान हुतात्मा - लष्काराचे तीन जवान हुतात्मा
लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याने तीन जवान हुतात्मा झाले. तर तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात पूर्व सिक्कीममधील न्यू जवाहरलाल नेहरू रोडवर झाला.
लष्कराचा ट्रक दरीत कोसळला
न्यू जवाहरलाल नेहरू रोडवर हा अपघात झाला असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. हा मार्ग गंगटोकला भारत-चीन सीमेजवळील सोमगो लेक आणि नाथू लाशी जोडतो. ट्रकमध्ये कुमाऊं रेजिमेंटचे सहा जवान होते. ते गंगटोककडे जात होते. चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ते 600 फूट खोल दरीत कोसळले. यात चालक व इतर दोन जवान जागीच ठार झाले. तर तीन जवानांना रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.