फतेहपूर (उत्तरप्रदेश): Train Derailed: कानपूर-प्रयागराज सेक्शनजवळील रामवा स्टेशनवर मालगाडीचे २९ डबे रुळावरून घसरले. मालगाडी रुळावरून घसरल्याने 20 गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दुरुस्तीचे काम सुरू आहे. goods train derail in Fatehpur
Train Derailed: मालगाडीचे 29 डबे रुळावरून घसरले, 20 गाड्या थांबल्या - फतेहपुरमध्ये रेल्वे रुळांवरून उतरली
Train Derailed: फतेहपूरमधील रामवा स्थानकावर मालगाडीचे २९ डबे रुळावरून घसरले. अपघातानंतर वंदे भारतसह 20 गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरू आहे. goods train derail in Fatehpur
![Train Derailed: मालगाडीचे 29 डबे रुळावरून घसरले, 20 गाड्या थांबल्या 29 coaches of goods train derailed in fatehpur of up](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16728003-thumbnail-3x2-train.jpg)
एएनआयच्या वृत्तानुसार, रविवारी सकाळी फतेहपूरजवळील रामवन स्थानकावर मालगाडीचे २९ डबे रुळावरून घसरले. या अपघातानंतर संपूर्ण ट्रॅकचे नुकसान झाले आहे. वंदे भारत एक्स्प्रेससह 20 गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर हावडा-दिल्ली रेल्वे मार्ग विस्कळीत झाला आहे. कानपूर आणि प्रयागराजमध्ये गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.
त्याचवेळी अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. दुसरीकडे चौरी-चौरा एक्स्प्रेस अंशत: रद्द करण्यात आली आहे. चौरी-चौरा एक्स्प्रेस खागा स्थानकावरून परत आली असून, प्रयागराजहून गोरखपूरला पाठवण्यात आली आहे.