मुंबई - देशाच्या १६व्या राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया ( Presidential Election 2022 ) पार पडली. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) उमेदवार आहेत. तर, विरोधकांकडून संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा ( Yashwant Sinha ) यांच्यात सरळ लढत होत आहे. भाजप-शिंदे गटाने ( BJP Shinde group ) राष्ट्रपती पदासाठी मुर्मु यांना मतदान करणार असल्याचे जाहीर केले. शिवसेनेनेही मुर्मु यांना पाठिंबा दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या आदेशानुसार सेनेच्या आमदारांनी मुर्मु यांना मतदान केले. काँग्रेस, राष्ट्रवादीने यशवंत सिन्हा यांच्या पारड्यात मते टाकल्याचे समजते. मतदानाला सुरुवात होताच सकाळच्या सत्रात विरोधी पक्षनेते अजित पवार, ( Leader of Opposition Ajit Pawar ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ( Chief Minister Eknath Shinde ) देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावला. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य आणि सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांच्या सदस्यांनी मतदान प्रक्रियेत घेतला होता.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत असलेल्या वेळेत २८३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती विधिमंडळाचे प्रधान सचिव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत ( Rajendra Bhagwat ) यांनी दिली. केंद्रीय निवडणूक निरीक्षक अमित अगरवाल, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधिमंडळाचे उपसचिव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर यांनी कामकाज पाहिले.
राष्ट्रपती निवडणुकीचे काय आहे गणित?राष्ट्रपतींची निवड बॅलेट पेपरद्वारे केली जाते. यामध्ये मतदाराला प्राधान्याने मतदान करायचे आहे. या निवडणुकीत दोनच उमेदवार असल्याने मतदाराला पहिली, दुसरी पसंती नमूद करावी लागणार आहे. या निवडणुकीत लोकसभेचे 543, राज्यसभेचे 233, विधानसभेचे 4, हजार 33 सदस्य आहेत. अशा प्रकारे एकूण 4 हजार 809 मतदार होते. लोकसभा, राज्यसभेचे 776 खासदारांच्या मतांची किंमत 5,लाख 43 हजार,200 इतकी आहे.तसेच सर्व आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य 5,लाख 43 हजार 231 आहे. अशा प्रकारे राष्ट्रपती निवडणुकीतील एकूण मतांचे मूल्य 10 लाख 86 हजार 431 आहे.