गुवाहाटी- आसाममधील पूरस्थितीत किंचित सुधारणा झाल्याचे ( floods and landslides in Assam ) वृत्त असतानाही बुधवारी आसाममधील पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या २६ वर पोहोचली आहे. पूरस्थितीत किंचित सुधारणा झाली असली तरी नागाव येथील धरमतूल येथे कोपिली नदी ( Kopili River at Dharamtul ) धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. एएसडीएमएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण 81,712 लोक 346 मदत शिबिरांमध्ये आश्रय घेत आहेत.
सुमारे दोन आठवड्यांपूर्वी आसाम आलेल्या पुराच्या पहिल्या लाटेमुळे 4000 हून अधिक गावांमधील 9 लाखांना ( first wave of floods in Assam ) फुटका बसला आहे. पुरामुळे रस्ते, पुलांचे नुकसान झाले आहे. राज्यातील विविध दुर्गम भागातील दळणवळण खंडित करणारे रेल्वे मार्ग वाहून गेले आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ( Assam State Disaster Management Authority ) सांगितले की, गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (NDMA) रवीनेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यांचे आंतर-मंत्रालयीय केंद्रीय पथक कचारला भेट देणार आहे. दिमा हासाओ, दारंग, नागाव आणि होजई पावसामुळे झालेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.
कोपिली नदीने ओलांडली धोक्याच्या पातळी-पूरस्थितीत किंचित सुधारणा झाली असली तरी नागाव येथील धरमतूल येथे कोपिली नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. एएसडीएमएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण 81,712 लोक 346 मदत शिबिरांमध्ये आश्रय घेत आहेत. मदत छावण्यांमध्ये आश्रय न घेणाऱ्या इतर बाधित लोकसंख्येलाही मदत साहित्याचे वाटप करण्यात आले. मदत वितरण केंद्रे तात्पुरती उघडली आहेत.