अमरावती(आंध्रप्रदेश) -आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी (Andhra Pradesh CM YS Jaganmohan Reddy) यांनी सोमवारी त्यांच्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना (Reconstituted Cabinet) केली आहे. राज्य सचिवालयाजवळ आयोजित समारंभात राज्यपाल बिस्व भूषण हरिचंदन यांनी सुधारित मंत्रिमंडळाच्या 25 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी YSR काँग्रेसचे (YSRCP) नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे सरकार स्थापनेनंतर जगनमोहन सरकारमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा फेरबदल आहे.
राज्यपालांनी दिली नवीन मंत्र्यांना शपथ - शपथ घेणार्यांपैकी अकरा जण जून 2019 पासून पूर्वीच्या मंत्रिमंडळाचा भाग होते. त्यांना आता पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर उर्वरित नवीन चेहरे आहेत. अंबाती रामबाबू यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. आदिमलुपू सुरेश, उषा श्रीचरणन आणि पेड्डीरेड्डी रामचंद्ररेड्डी यांनी इंग्रजीत शपथ घेतली तर इतर सर्व मंत्र्यांनी तेलुगूमध्ये शपथ घेतली. CM जगन मोहन रेड्डी यांनी 2019 मध्ये सत्तेत येताना आपल्या मंत्रिमंडळात मध्यावधी बदल करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार हा फेरबंदल करण्यात आला आहे.
14 नवीन चेहऱ्यांना संधी - धर्मा प्रसाद राव, पी राजन्ना डोरा, गुडिवाडा अमरनाथ, बड्डी मुथ्याला नायडू, दादीशेट्टी राजा, कारुमुरी नागेश्वरराव, किट्टू सत्यनारायण, जोगी रमेश, अंबाती रामबाबू, मेरागा नागार्जुन, विडादला रजनी, काकानी गोवर्धनरेड्डी, आरके रोजा आणि उषा श्रीचरण