महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Heroin Recovered From Pak Border : पाकिस्तान सीमेजवळून 25 किलो हेरॉईन जप्त, जवानांची तस्करांशी चकमक - अमली पदार्थांचे तस्कर भारतीय सीमेत

बीएसएफचे जवान गस्त घालत असताना धुक्याचा फायदा घेऊन अंमली पदार्थांचे तस्कर पळून गेले. त्यानंतर बीएसएफने शोध घेतला असता सीमेवरून सुमारे 25 किलो हेरॉईन जप्त करण्यात आली. (heroin recovered from Pakistan border). (25 kg heroin recovered).

Heroin
Heroin

By

Published : Dec 21, 2022, 5:54 PM IST

फाजिल्का (पंजाब) : अबोहर सेक्टरमध्ये बीएसएफने पाकिस्तानी तस्करांचे मनसुबे उधळून लावले आहेत. बीएसएफने भारत पाकिस्तान सीमेवरून 25 किलो हेरॉईन जप्त केली. (25 kg heroin recovered). सीमावर्ती भागात अमली पदार्थ तस्करीची ही पहिलीच घटना नाही. वर्षाच्या या काळात धुक्याचा फायदा घेऊन अमली पदार्थांचे तस्कर भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करतात. (heroin recovered from Pakistan border).

गेल्या काही वर्षांत अनेक प्रकरणे उघडकीस : बीएसएफचे जवान गस्त घालत असताना त्यांना सीमेवर गोंधळ दिसला, त्यामुळे जवानांनी गोळीबार केला. त्यादरम्यान दुसऱ्या बाजूनेही गोळीबार सुरू झाला. यावेळी धुक्याचा फायदा घेऊन अंमली पदार्थांचे तस्कर पळून गेले. त्यानंतर बीएसएफने शोध घेतला असता भारत पाकिस्तान सीमेवर सुमारे 25 किलो हेरॉईन जप्त करण्यात आली. दाट धुक्यात देखील बीएसएफ पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. बीएसएफच्या सतर्कतेमुळे सीमेपलीकडून पाठवण्यात येणारे हेरॉईन आणि शस्त्रास्त्रांची खेप रोखण्यात आली आहे. काटेरी तारांच्या पलीकडे असलेल्या शेतातून हेरॉईनची खेप अनेक वेळा जप्त करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानातून सातत्याने ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची खेप भारतात पाठवली जात आहे. यावर बीएसएफची करडी नजर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details