नवी दिल्ली- ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा आणि बेडची कमरता अशा समस्यांना सामोरे जाणाऱ्या दिल्लीकरांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. नॉर्थ एमसीडी हिंदूराव रुग्णालयामधून २३ कोरोनाबाधित पळून गेले आहेत. नॉर्थ एमसीडीचे महापौर जयप्रकाश यांनी प्रशासन प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगितले आहे. सर्व रुग्णांचा ठावठिकाणा लावला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नॉर्थ एमसीडीमध्ये हिंदुराव रुग्णालय हे सर्वात मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयात १८ एप्रिलपासून कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. १८ एप्रिलपासून हिंदुराव रुग्णालयामधील एकूण २३ कोरोनाबाधित पळून गेले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे.