हैदराबाद -सध्या तेलंगणामध्ये कोविड -19 रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, येथील सूर्यपेट शहरात एकाच कुटुंबातील 22 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
काही दिवसांपूर्वी अंत्यसंस्काराला हजेरी लावल्यानंतर कुटुंबातील अनेकांना संसर्ग झाला आहे. हे सर्व लोक एकाच परिसरात राहतात. जिल्हा वैद्यकीय व आरोग्य अधिकारी के. हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार, त्यापैकी कोणालाही काहीही लक्षणे नाहीत.
'सध्या घरातील बाधित आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती विलगीकरणात आहेत. आम्ही त्यांच्या स्थितीवर लक्ष ठेवत आहोत,' असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
हर्षवर्धन यांनी असेही स्पष्ट केले की, कुटुंबातील कोणत्याही सदस्याने हवाई प्रवास केला नव्हता. तसेच, ब्रिटनमध्ये विषाणूच्या नवीन प्रकाराचा संसर्ग होण्याची शक्यताही त्यांनी नाकारली.
हेही वाचा -'मतदान प्रक्रियेसारखी बूथवर मिळेल कोरोनाची लस'
कुटुंबातील एका सदस्याला क्षयरोग होता आणि त्याच्या नियमित तपासणीदरम्यान त्याची कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली, जी पॉझिटिव्ह आली. ही व्यक्ती एका नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेली होती. यामुळे तेथे उपस्थित असलेले इतर लोकही सावध झाले. आरोग्य विभागाने 38 लोकांच्या गटाची कोविड चाचणी केली. त्यातील 22 जणांना संसर्ग स्पष्ट झाले.
जवळपास चार महिन्यांनंतरची ही पहिली घटना आहे, ज्यात एकाच कुटुंबातील इतक्या मोठ्या संख्येने लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
हर्षवर्धन यांनी सांगितले की, अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांनी सामाजिक अंतरासारख्या उपायांचे पालन केले नव्हते. या लोकांच्या शेजार्यांचेही या नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तसेच, परिसराची स्वच्छता केली आहे. त्यांनी सांगितले की, या विषाणूचा सामुदायिक प्रसार झालेला नाही.
हेही वाचा -क्लिनिकल ट्रायलसाठी २३ हजार स्वयंसेवकांना सहभागी करणार भारत बायोटेक