महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gujarat hooch tragedy : गुजरातमध्ये विषारी दारुमुळे 28 जणांचा मृत्यू, 50 जण रुग्णालयात - Gujarat hooch tragedy

अवैधरित्या विक्री होणारी दारु ( Illicit Liquor Sell In Gujarat ) प्यायल्यामुळे 28 जणांचा गुजरातमध्ये मृत्यू ( 28 Death In Gujarat ) झाला आहे. या प्रकरणात 50 जणांना भावनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील 28 जणांचा मृत्यू झाला आहे. दारूऐवजी थेट केमीकलच दारुच्या नावाखाली विकले जात होते ही बाब निदर्शनास आली आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत 14 आरोपी निश्चित करण्यात आले आहेत.

22 Feared death
28 death

By

Published : Jul 26, 2022, 9:49 AM IST

Updated : Jul 26, 2022, 3:12 PM IST

अहमदाबाद -अवैधरित्या विक्री होणाऱ्या दारूमुळे ( Illicit Liquor Sell In Gujarat ) 28 जणांचा गुजरातमधील भावनगरमध्ये मृत्यू झाला ( 28 Death In Gujarat ) आहे. 25 जुलै रोजी ही घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात 47 जणांना भावनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील 28 जणांचा मृत्यू झाला आहे. बोटाड जिल्ह्यातील रोजीड गाव आणि धंधुका, भावनगर येथे अवैध दारू पिऊन अनेक जण आजारी पडल्याचे सूत्रांनी सांगितले.

गुजरातमध्ये विषारी दारुमुळे 28 जणांचा मृत्यू

धंधुका, भवानीनगर आणि बोताड - या तीन जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यासोबतच मृतांची संख्याही वाढत आहे. या सर्व प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. आयजी अशोक यादव यांनी एसआयटी स्थापन करून तपासाचे आदेश दिले आहेत. या दारूबाबतअनेक वाद निर्माण झाले असून राजकीय भांडणही पाहायला मिळत आहे. बोताड जिल्ह्यात २५ जुलै रोजी एक घटना उघडकीस आली होती. या घटनेत 47 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच 28 जणांचा मृत्यू झाला.

ट्रॅक्टरमधून नेऊन मृतदेहांवर अंत्यसंस्कार

अनेकजण पडले आजारी - बोटाड जिल्ह्यातील रोजीड गाव आणि धंधुका, भावनगर येथे अवैध दारू पिऊन अनेक जण आजारी पडले. 50 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर 28 जण मृत्युमुखी पडले. गुजरातमधील बोताड जिल्ह्यातील रोजिद गावात बनावट दारू प्यायल्याने आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. या लोकांनी 40-40 रुपयांना अवैध दारूच्या छोट्या पिशव्या विकत घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ते प्यायल्याने लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर 50 हून अधिक लोक अजूनही आजारी आहेत.

शोकाकूल कुटुंबातील महिला

गुन्हा दाखल -पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये 14 जणांची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित जवळपास सर्व आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील लोकांनी थेट रसायनमिश्रित दारू प्यायले. एफएसएलच्या अहवालातही ही बाब समोर आली आहे. गावातील लोक कथितपणे वापरत असलेल्या दारूमध्ये 98% पेक्षा जास्त मिथाइल आढळले आहे.

दारूच्या नावाखाली केमिकलचे पाऊच -याप्रकरणी पोलिसांनी मोठा दावा केला आहे. आरोपी दारू विकत नसून, दारूच्या नावावर केमिकलचे पाऊच बनवून थेट लोकांना विकत असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे संपूर्ण प्रकरण तीन टप्प्यांमध्ये विभागले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमॉस कंपनी मिथाईलच्या व्यवसायाशी संबंधित आहे. इमॉस कंपनीचा गोदाम व्यवस्थापक जयेश उर्फ ​​राजू याची संशयास्पद भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. राजूला पोलिसांनी अहमदाबाद येथून ताब्यात घेतले आहे. राजूने गोदामातून रसायन बाहेर काढले.

केमिकलपासून दारू -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेशने 200 लिटर मिथाईल त्याचा नातेवाईक संजय याला 60 हजार रुपयांना दिले. यानंतर संजय, पिंटू व इतर लोकांनी या केमिकलपासून दारू न बनवता दारूच्या नावाखाली थेट लोकांना केमिकलची पाकिटे दिली. हे केमिकल प्यायल्याने लोकांचा मृत्यू झाला. एफएसएलचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्वांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

हेही वाचा -Narayan Rane : नारायण राणेंना हायकोर्टाचा दिलासा, अवैध बांधकाम प्रकरणी महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

Last Updated : Jul 26, 2022, 3:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details