महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Ukraine-Russia war : युक्रेन- रशिया युध्दाचा 21 वा दिवस! युक्रेनवर चर्चा करण्यासाठी बायडेन युरोपला जाणार - president of russia vladimir putin

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज २१ वा दिवस आहे. युद्धाच्या दरम्यान, रशियन परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे की मॉस्को युरोप कौन्सिलमधून माघार घेत आहे. त्याचवेळी युक्रेनवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन युरोपला जाणार आहेत. (21st day of Ukraine-Russia war) दुसरीकडे, झेलेन्स्कीने कॅनडाला मदतीचे आवाहन केले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय न्यायालय या युद्धाबाबत आपला निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

युक्रेन- रशिया युध्दाचा 21 दिवस
युक्रेन- रशिया युध्दाचा 21 दिवस

By

Published : Mar 16, 2022, 10:18 AM IST

कीव : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाने युरोपियन मानवाधिकार परिषदेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आपल्या भाषणात कॅनडाला मदतीचे आवाहन केले आहे. (NATO EU summits) दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन युक्रेनवरील रशियन आक्रमणाबाबत युरोपीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात युरोपला भेट देणार आहेत.

आंतरराष्ट्रीय न्यायालय आपला निकाल देऊ शकते

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन 24 मार्च रोजी ब्रुसेल्समध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) आणि युरोपियन नेत्यांची भेट घेणार आहेत. या सगळ्या दरम्यान, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या वरिष्ठ सहाय्यकाचे म्हणणे आहे, की रशियाने संभाव्य तोडगा काढण्याच्या चर्चेत आपली भूमिका नरम केली आहे. (Russia says quitting Council of Europe) मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालय आपला निकाल देऊ शकते.

फॉक्स न्यूज व्हिडिओ पत्रकाराचा युक्रेनमध्ये मृत्यू

युक्रेनमधील फॉक्स न्यूज व्हिडिओ रिपोर्टर कीवच्या बाहेर दुसर्‍या रिपोर्टरसोबत प्रवास करत असताना त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या वाहनाला गोळीबार झाला. कंपनीने ही माहिती दिली. कंपनीने कर्मचार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की व्हिडिओग्राफर पियरे झाकर्झेव्स्की (55), ज्याने आपला जीव गमावला, त्यांनी फॉक्स न्यूजसाठी इराक, अफगाणिस्तान आणि सीरियामधील युद्ध देखील कव्हर केले.

रशियाने आपली भूमिका मवाळ केली आहे: युक्रेन

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या वरिष्ठ सहाय्यकाने म्हटले आहे की संभाव्य तोडग्याबद्दलच्या चर्चेत रशियाने आपली भूमिका मऊ केली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे वरिष्ठ उपप्रमुख इहोर झोव्हकोवा म्हणाले की, रशियन आणि युक्रेनियन प्रतिनिधींमधील चर्चा अधिक रचनात्मक झाली आहे. रशियाने आपला सूर बदलला असून युक्रेनला आत्मसमर्पण करण्याची मागणी त्यांनी थांबवली आहे, असे ते म्हणाले.

व्हिडिओ कॉलवरून चर्चा

चर्चेच्या सुरुवातीला रशिया या मागणीसाठी (शरणागती) आग्रह धरत आहे. या महिन्यात बेलारूसमध्ये तीन फेऱ्यांच्या चर्चेनंतर रशियन आणि युक्रेनियन यांच्यात व्हिडिओ कॉलवरून चर्चा झाली. झोव्हकोवा म्हणाले की, युक्रेनच्या प्रतिनिधींना चर्चेनंतर तोडगा निघण्याची काहीशी आशा होती. ते म्हणाले की झेलेन्स्की आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेटणे आवश्यक आहे असही ते म्हणाले.

हेही वाचा -नौगाम भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक

ABOUT THE AUTHOR

...view details