नवी दिल्ली: पश्चिम विहार परिसरात १२ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ( delhi minor gang rape case ) पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली ( Delhi Police caught six accused ) आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी पाच अल्पवयीन आहेत. आरोपींपैकी एक 21 वर्षांचा आहे. गेल्या शुक्रवारी ( 20 मे ) आरोपींनी मुलीवर रेल्वे गेटजवळील जंगलात सामूहिक बलात्कार केला होता. तसेच मोबाईलवरून व्हिडिओ बनवला होता.
जिल्हा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलीने शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांना सांगितले की, ती तिच्या घरातून परिसरातील रेल्वे गेटजवळ असलेल्या एका दुकानात एका छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरण्यासाठी गेली होती. तेथे तिच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाने तिला कारणं सांगत रेल्वे ट्रॅकजवळ नेले. तिथे काही मुले आधीच उपस्थित होती. आरोपीने मुलीचा व्हिडिओ बनवला आणि धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित मुलगी कशीतरी घरी पोहोचली आणि तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पश्चिम विहार पश्चिम पोलिसांनी भादंवि कलम ३५४, ३५४बी, ३४१, ३७६डीए आणि ६/१७/२१ पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तीन आरोपी दिल्ली सोडण्याच्या तयारीत होते. मात्र मोबाईल लोकेशनवरून तिघेही पकडले गेले.