महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Coronavirus New Cases : देशात 20,409 कोरोना रुग्णांची नोंद, 47 रुग्णांचा मृत्यू - Coronavirus New Cases

देशभरात आज 20,409 कोरोना रुग्णांची ( Corona patient ) नोंद करण्यात आली आहे. ज्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4,39,79,730 झाली. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईतील सर्व जम्बो करोना रुग्णालये बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. केवळ मरोळ येथील सेव्हन हिल्स ( Seven Hills Hospital )आणि चुनाभट्टीजवळील के. जे. सोमय्या जम्बो रुग्णालय सुरू राहणार आहेत.

corona
कोरोना

By

Published : Jul 29, 2022, 10:31 AM IST

मुंबई - देशात आज ( शुक्रवारी ) 20,409 कोरोना रुग्णांची ( Corona patient ) नोंद करण्यात आली आहे. ज्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4,39,79,730 झाली. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय कोरोना रुग्णांची 1,43,988 पर्यंत कमी झाली आहे. तर कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची संख्या 5,26,258 पर्यंत गेली आहे. देशात 0.9 टक्के सक्रिय रूग्ण आहेत. तर कोरोनातून बरे होण्याचा दर 98.5 टक्के नोंदवला गेला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थीती -महाराष्ट्रात 116 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली ( Corona in Maharashtra ) आहे. ठाण्यात गुरुवारी 809 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात झाली आहे. असे असले तरी काल दिवसभरात एकाही मृत्यूची नोंदकरण्यात आली नाही.

ओडिशात कोरोनाची परिस्थीती - शुक्रवारी 1,020 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली, त्यामुळे ओडिशातील ( Corona in Odisha ) एकूण संक्रमित झालेल्या रूग्णांची संख्या 13,11,135 झाली. सुंदरगढ जिल्ह्यात सर्वाधिक 259 प्रकरणे नोंदवली गेली. असून त्यानंतर खोरडा जिल्ह्यात 158 केसेस समोर आले आहेत. ओडिशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६,७८७ आहे.

जम्बो कोविड सेंटर बंद - करोना साथीचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता मुंबईतील सर्व जम्बो करोना रुग्णालये बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. केवळ मरोळ येथील सेव्हन हिल्स आणि चुनाभट्टीजवळील के. जे. सोमय्या जम्बो रुग्णालय ( K J. Somaiya Jumbo Hospital ) सुरू राहणार आहेत. दैनंदिन सुमारे अडीचशे रुग्ण नव्याने आढळत असले तरी रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या २० पेक्षाही कमी आहे. करोनाचा प्रादुर्भावही आता कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेले गोरेगावचे नेस्को, बीकेसी, मुलुंड, भायखळा येथील रिचर्डसन अण्ड क्रुडास, वरळीचे एनएससीआय, कांजुरमार्ग, दहिसर आणि मालाड ही जम्बो रुग्णालये पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

हेही वाचा -Commonwealth Games Start : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला शानदार प्रारंभ, पी. व्ही. सिंधू, मनप्रित सिंहच्या हाती तिरंगा

ABOUT THE AUTHOR

...view details