श्रीनगर (जम्मू) - दोन ठिकाणी झालेल्या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाला ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. या चकमकी गुरुवारी कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात झाल्या.
कुलगाम जिल्ह्यातील झोदार भागात दहशवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून सुरक्षा दलाने या भागात शोध मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला, त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. यात दोन लष्कर-ए-तैयबा संघटनेचे दहशतवादी ठार झाले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.