नवी दिल्ली - पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज सोमवारी (दि. 11 एप्रिल)रोजी पेंटागॉन येथे संरक्षण सचिव लॉयड जे ऑस्टिन यांची भेट घेणार आहेत. ते 10 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यामध्ये ते भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा करणार आहेत.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकरही उपस्थित राहणार - रशिया आणि युक्रेनमध्ये 46 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजपासून 5 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे संरक्षण सचिव अँटनी ब्लिंकन यांच्यासोबतच्या टू प्लस टू चर्चेला राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यात युक्रेन संकटावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. राजनाथ सिंह यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकरही उपस्थित राहणार आहेत.
मला आशा आहे की हा संवाद फलदायी होईल - मी वॉशिंग्टन डीसी येथे चौथ्या भारत-अमेरिका 2+2 मंत्रीस्तरीय संवादाला उपस्थित राहण्यास उत्सुक आहे. तसेच, या भेटीदरम्यान मी येथील (INDOPACOM) मुख्यालयाला भेट देणार आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी शनिवारी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, अमेरिका भेटीमुळे मला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होतील. मला आशा आहे की हा संवाद फलदायी होईल.
दोन्ही बाजूंना सक्षम करेल - भारत आणि अमेरिका आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री (ईएएम) एस जयशंकर आणि त्यांच्या संबंधित अमेरिकन समकक्षांमध्ये 2+2 संवाद आयोजित करण्यात आला आहे. हा संवाद अधिक दृढ करण्यासाठी धोरणात्मक मार्गदर्शन आणि दृष्टीकोन प्रदान करण्याच्या उद्देशाने परराष्ट्र धोरण, संरक्षण आणि सुरक्षेशी संबंधित भारत-अमेरिका द्विपक्षीय अजेंडातील क्रॉस कटिंग मुद्द्यांचा सर्वसमावेशक आढावा घेण्यास दोन्ही बाजूंना सक्षम करेल असे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदन म्हटले आहे.
पॅसिफिक कमांडच्या मुख्यालयालाही भेट देणार - या महत्त्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींबद्दल समान हितसंबंधास चिंतेच्या मुद्द्यांवर आम्ही एकत्र काम कसे करू शकतो याबद्दल चर्चा होईल. तसेच, विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी देखील प्रदान करता येईल असही निवेदनात म्हटले आहे. राजनाथ सिंह आणि एस जयशंकर 11 एप्रिल रोजी लॉयड ऑस्टिन आणि अँटोइन ब्लिंकन यांच्याशी चर्चा करतील. यासोबतच राजनाथ सिंह हवाई येथील इंडियन पॅसिफिक कमांडच्या मुख्यालयालाही भेट देणार आहेत.
समान उद्दिष्टे पुढे नेण्यात मोठी भूमिका - भारत-अमेरिकेदरम्यान '2+2' चर्चा सुरू होण्यापूर्वी व्हाईट हाऊसकडून एक महत्वपुर्ण विधान समोर आले आहे. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचा विश्वास आहे की भारत-अमेरिका संबंध हे जगातील सर्वात महत्त्वाचे आहेत आणि आशा आहे की या चर्चेमुळे आमचे संबंध आणखी सुधारतील. यादरम्यान, त्यांनी असेही सांगितले की हा संवाद इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील समान उद्दिष्टे पुढे नेण्यात मोठी भूमिका बजावेल.
हेही वाचा -Modi Biden Talks : पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्यात सोमवारी ऑनलाइन बैठक