श्रीनगर- जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा नायनाट करण्याची मोहिम सुरुच आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये अनंतनाग जिल्ह्यात चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.
सैन्यदलाने पोलिसांसमवेत अनंतनाग जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांविरोधात मोहिम सुरू केली आहे. सैन्यदलाला दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सैन्यदलाचे १९ आरआर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने कॉर्डन आणि सर्च ऑपरेशन सुरू केले. दोन्ही टीमचे दल हे संशयास्पद ठिकाणी पोहोचले. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाने गोळीबार केल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. यावेळी चकमकीत तीन अज्ञात दहशतवादी ठार झाल्याचेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा दलाची अजूनही मोहिम सुरू आहे.
हेही वाचा-कडकनाथचे चिकन खाल्ल्याने वाढते प्रतिकारक्षमता, मध्य प्रदेशमधील संशोधन संस्थेचा दावा