नवी दिल्ली -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Union Minister Nirmala Sitharaman ) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या काळातील हा तिसरा अर्थसंकल्प तर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचा अर्थमंत्री म्हणून चौथा अर्थसंकल्प होता. यावेळी मध्यम आणि लघू उद्योगांसाठी 2 लाख कोटींच्या अर्थसहाय्यची घोषणा सीतारामन यांनी केली.
संसदेत बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, मध्यम आणि लघू उद्योजकांसाठी 2 लाख कोटींचे अर्थसहाय्य केले जाणार आहे. एमएसएमईला बळकटी देण्यासाठी नवीन योजना सुरू केल्या जाणार आहे. तर 6 हजार कोटी एमएसएमई क्षेत्राला दिले जाणार आहे. उदयम, ई-श्रम, NCS आणि असीम पोर्टल एकमेकांशी जोडले जातील. यामुळे त्यांची व्याप्ती वाढली जाणार आहे. हे थेट सेंद्रिय डेटाबेससह कार्य करणारे प्लॅटफॉर्म असतील. क्रेडिट सुविधा प्रदान करतील आणि उद्योजकतेसाठी शक्यता निर्माण करतील.