महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Fire in Greater Kailash: सेवा गृहात लागली भीषण आग, 2 जणांचा जळून मृत्यू - 2 जणांचा मृत्यू

Fire in Greater Kailash: दिल्लीत पुन्हा एकदा भीषण आगीची घटना समोर आली आहे. (Greater Kailash) दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलाश-२ च्या ई ब्लॉकमध्ये असलेल्या ज्येष्ठ नागरिक सेवा गृहाला लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. (Delhi Fire) अग्निशमन विभागाने 6 जणांना सुखरूप बाहेर काढले.

Fire in Greater Kailash
ग्रेटर कैलासमधील सेवा गृहात भीषण आग

By

Published : Jan 1, 2023, 11:05 AM IST

दिल्ली:रविवारी पहाटे नवी दिल्लीतील ग्रेटर कैलास-2 परिसरातील ज्येष्ठ नागरिक सेवा गृहाला लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. (Fire in Greater Kailash) मिळालेल्या माहितीनुसार (Greater Kailash) आग आटोक्यात येईपर्यंत दोन्ही पीडितांचा मृत्यू झाला होता, (Delhi Fire) आणि ई ब्लॉक इमारतीतून ६ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते. (Senior Citizen Care Home) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 5.15 च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली आणि आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ तैनात करण्यात आल्या होते.

अधिका-यांनी सांगितले की अग्निशमन विभाग आणि पोलिसांची प्रत्येकी एक टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. सकाळी सातच्या सुमारास आग पूर्णपणे आटोक्यात करण्यात अग्निशमन दलाच्या अधिका-यांना यश आले आहे. ग्रेटर कैलास 2 मध्ये असलेल्या अंतरा केअर फॉर सीनियर्स, E 585A मध्ये आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेली आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.सध्या आग कोणत्या कारणाने लागली, याचा पोलिस शोध घेत आहेत.

काय घडल नेमकंं:ग्रेटर कैलास भागात असलेल्या या नर्सिंग होमला रविवारी पहाटे आग लागली. येथे ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली जाते. ही आग कशी लागली? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची आणि जखमींची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. 17 डिसेंबरच्या सकाळी दिल्लीतील ग्रेटर कैलास पार्ट-1 येथील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये आग लागली होती. मात्र, या आगीत कोणीही जिवीतहानी झाली नाही. मात्र आग लागल्यानंतर गोंधळ उडाला. अग्निशमन दलाच्या पथकाने अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

ABOUT THE AUTHOR

...view details