महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तर काश्मीरमध्ये जैशच्या दोन दहशतवाद्यांना अटक - जम्मू-काश्मीर दहशतवादी अटक

उत्तर काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यात करण्यात आलेल्या एका कारवाईमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दोन सदस्यांना अटक करण्यात आली आहे. आज पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये अब्दुल मजीद खान याला अटक केली. खान हा कार्लपुरा भागातील रहिवासी होता. त्यानंतर खानची चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून शौकत एहमद या आणखी एका दहशतवाद्याबाबत माहिती मिळाली, जो सोपोरेचा रहिवासी आहे.

2 JeM associates arrested in North Kashmir
उत्तर काश्मीरमध्ये जैशच्या दोन दहशतवाद्यांना अटक

By

Published : Feb 2, 2021, 7:27 PM IST

श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यात करण्यात आलेल्या एका कारवाईमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दोन सदस्यांना अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई..

बंदीपोराचे एसएसपी राहुल मलिक यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून उत्तर काश्मीरमधील काही भागांमध्ये दहशतवादी संघटनांमध्ये भरती घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्यानंतर त्यादृष्टीने तपास सुरू केला होता.

दोन दहशतवाद्यांना अटक..

याप्रकरणी आज पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये अब्दुल मजीद खान याला अटक केली. खान हा कार्लपुरा भागातील रहिवासी होता. त्यानंतर खानची चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून शौकत एहमद या आणखी एका दहशतवाद्याबाबत माहिती मिळाली, जो सोपोरेचा रहिवासी आहे. या दोघांनाही अटक करण्यात आली.

कित्येक वर्षांपासून सुरू होत्या दहशतवादी कारवाया..

अब्दुल मजिद हा गेल्या कित्येक वर्षांपासून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. हे दोघेही दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांसह इतर आवश्यक गोष्टींचा पुरवठा करत होते. तसेच, उत्तर काश्मीरमधील तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी करण्याची जबाबदारीही खानवर देण्यात आली होती, अशी माहिती मलिक यांनी दिली.

हेही वाचा :संरक्षण क्षेत्रासाठी भारत इतर देशांवर अवलंबून राहू शकत नाही - राजनाथ सिंह

ABOUT THE AUTHOR

...view details