आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
- नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणीची शक्यता
शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ला प्रकरणामुळे भाजपाचे आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी तातडीने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज ( बुधवारी ) तातडीने सुनावणी होणार असल्याची शक्यता आहे.
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज घेणार पदाधिकाऱ्यांची बैठक
आगामी मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आज पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे बैठक घेणार असून, या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे.
- राज्यभरात आज पावसाची शक्यता
सध्या काही भागात थंडी आहे. त्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी आणि धुक्याचे साम्राज्य आहे. त्यामुळे आज वातावरण बदल होवून मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
- एमपीएसच्या गट ब परीक्षेवर आज न्यायालयात सुनावणी
एमपीएससी गट ब मुख्य परीक्षा न्यायालयीन कारणांमुळे पुढे ढकलल्याची माहिती एमपीएससी आयोगाकडून देण्यात आली आहे. 5 आणि 12 फेब्रुवारीला ही परीक्षा होणार होती. काही विद्यार्थ्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्याने परीक्षा पुढे ढकलत असल्याची माहिती आयोगाकडून दिली गेली आहे. एमपीएसीच्या विद्यार्थ्यांनी हायकोर्टात जी याचिका दाखल केली आहे, त्यावर आज सुनवाणी होणार आहे.
- अंडर-19 विश्वचषक सेमीफायनलाचा समान आज
अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य पूर्व फेरीत भारताने गतविजेत्या बांग्लादेशचा पाच विकेट्सनी पराभव करत सेमीफायनल गाठली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनलचा हा सामना आज खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी खेळवला जाणार आहे.
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
कालच्या महत्वाच्या बातम्या -
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर ( Nirmala Sitharaman Union Budget 2022 ) केला आहे. दीड तास सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. यामध्ये कोरोनादरम्यान महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. मोबाईल फोन, चार्जर, कपडे आदी वस्तू स्वस्त होणार आहे.
मुंबई - देशाला कररुपाने सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर अन्याय करण्याची परंपरा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Finance Minister Nirmala Sitharaman ) यांनी या अर्थसंकल्पातही ( Union Budget 2022 ) कायम राखली आहे. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात एकूण २ लाख २० हजार कोटींचा एकूण केंद्रीय जीएसटी वसूल केला. त्यातले तब्बल ४८ हजार कोटी महाराष्ट्रातून वसूल करण्यात आले. या केंद्रीय जीएसटीच्या बदल्यात महाराष्ट्राला अवघे साडेपाच हजार कोटी रुपये परत मिळाले. निधी वाटपातल्या या अन्यायाचे प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पातही स्पष्टपणे दिसत असून, अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते शोधूनही सापडत नाही, अशी जोरदार टीका उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ( Ajit Pawar Reacted On Union Budget 2022 ) केली. दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटून प्रयत्न करावेत, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
मुंबई- महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नये, याबाबतच्या विधेयकांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी दिली. अर्थसंकल्पावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली, यावेळी ते बोलत होते. दरम्यान, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ ( Minister Chhagan Bhujbal ), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ( Minister Hasan Mushrif ) यांनी राज्यपालांची संध्याकाळी उशिरा भेट घेत राज्यपालांचे आभार मानले.
मुंबई - नितेश राणे न्यायालयात गेले. मात्र, सरेंडर झालेले नाहीत. ते जोपर्यंत सरेंडर होत नाही, तोपर्यंत जामीन अर्जासाठी पात्र होत नाही. अटक होत नाही तोवर जामिन मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया परिवहनमंत्री अनिल परब ( Transport Minister Anil Parab ) यांनी दिली. तसेच उच्च न्यायालयात तरी त्यांना पहिल्यांदा सरेंडर व्हावे लागेल. कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सरेंडर व्हायला पाठवले होते, असेही ते म्हणाले. ( Anil parab on nitesh rane )
मुंबई -वाढती बेरोजगारी, महागाई आणि सातत्याने कमी होत चाललेलं उत्पन्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. लोकांची क्रय शक्ती कमी होत असतांना खासगी क्षेत्रातील गुंतवणूक कमी होत आहे, अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पातून (Union Budget 2022) काही ठोस उत्तरे मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु, लोकमनातील ही अस्वस्थता केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेलीच दिसत नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प नोकरदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray on Budget 2022) यांनी दिली आहे.
ठाणे - मुंबईसह ठाणे जिह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्शभूमीवर भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने २४ लाखांचे स्फोटकासह तीन जणांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु केला आहे. अल्पेश उर्फ बाल्या हिराजी पाटील (वय ३४ वर्ष), पंकज अच्छेलाल चौहान ( वय २३ वर्ष) समीर उर्फ सम्या रामचंद्र वेडगा (वय २७ वर्ष,) असे अटक केलेल्या आरोपीचे नावे असून तिघेही पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे राहणारे आहेत.