दिल्ली: कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा बसत आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी दररोज लाखो कोरोना रुग्णांची नोंद होत होती ती आता 20 हजारा पेक्षा कमी दिसत आहे. गेल्या 24 तासात भारतात 19 हजार 968 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा 48 हजार 847 वर पोचला आहे. मात्र 673 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
सध्याचे सक्रिय रुग्ण: 2 लाख 24 हजार 187 (0.52%)
पाॅझिटिव्हिटी रेट: 1.68%