कानपूर:1984 मधे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Former PM Indira Gandhi) यांच्या हत्ये नंतर, कानपूर येथे दंगल उसळली. (1984 Sikh Riots Case) या संदर्भात स्थापण केलेल्या एसआयटी ने आत्तापर्यंत 67 दंगेखोरांवर आरोप (67 riotous allegations) निश्चित केले आहेत. त्यांची यादी शासनास देण्यात आली आहे. आदेश मिळताच त्यांना अटक केले जाणार आहे.
ती काळरात्र आजही आठवते
37 वर्षानंतर दंगलखोरांवर होत असलेल्या कारवाई संदर्भात 'ईटीव्ही भारत'च्या टीम ने दंगल पीडित गुरूविंदर सिंह भाटिया यांच्यांशी संवाद लाधला. तेव्हा त्यांनी सांगितले की न्याय मिळणे आणि न मिळणे सारखेच आहे. त्या दंगलीत दंगलखोरांनी त्यांचे वडील आणि भावाची हत्या करून सगळे लूटले होते. ते म्हणाले ती काळरात्र आजही आठवते. माझे घर आणि सगळेच संपूर्ण गेले.
वडील विश्वयुध्द लढले होते
दंगलीत गुरुद्वारा लुटला गेला, वडील आणि भाऊ गुरुग्रंथ साहिब घेउन घरी आले. ते मारून टाकतील याचा अंदाज आला नाही, नाही तर आम्ही पळून गेलो असतो. त्यातही मी परिवाराला घेउन निघालो शेजारच्या शाळेतील शिपायाने आम्हाला आसरा दिला. दंगलखोरांनी आमचे घर पेटवले, वडील सरदार हरबंस सिंह हे विश्वयुध्द लढले होते. दंगलखोरांनी त्यांना तसेच भाऊ महेंद्र सिंह यांना घरासोबत जाळले. यात फक्त माझ्या आजारी आईला त्यांनी सोडले.
37 वर्षा नंतर काय न्याय मिळणार
मी शरणार्थी कॅम्प मधे गेलो. नंतर एसआयटी आली होती त्यांना पुरावे दाखवले, आम्हाला न्याय मिळेल याची आशा नव्हती आणि न्याय मिळालाच नाही. 37 वर्षा नंतर काय न्याय मिळणार. सरकार या नुकसानीची काय भरपाई करणार आहे. मी कानपूर सोडून लुधियानाला गेलो होतो. 1989 मधे पुन्हा कानपूर ला आलो आणि पुन्हा जगायला लागलो आमची संपत्ती वादग्रस्त झाली ती मिळाली नाही त्या दंगलीत मी सगळेच हारलो. वडील आणि भावाची आजही आठवण येते ते दु:ख आजही आहे. 37 वर्षांनंतर मीळणे हा पण अन्यायच आहे. कारण इतक्या वर्षांनंतर न्याय मिळण्याला काहिच अर्थ नाही.