जोधपूर (राजस्थान) : 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान (1971 Indo pak war), भैरोसिंह (Bhairon Singh) यांनी लोंगेवाला पोस्टच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या घटनेवर बनलेल्या 'बॉर्डर' चित्रपटात सुनील शेट्टीने त्यांची व्यक्तिरेखा साकारली होती. काही दिवसांपूर्वी आजारी पडल्याने त्यांना जोधपूर एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. (1971 War Hero Bhairon Singh passed away).
सरकारकडून मदत मिळाली नाही : 16 डिसेंबरला विजय दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून त्यांच्याशी बोलायचे होते, मात्र आजारपणामुळे ते बोलू शकले नाहीत. त्यांचा मुलगा सवाई सिंग यांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि लोंगेवाला यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांचे कौतुकही केले. विशेष म्हणजे भैरो सिंह हे बीएसएफचे सैनिक होते पण त्यांना युद्धानंतर सैन्य पदक मिळाले. मात्र त्याचा त्यांना कुठलाही लाभ मिळाला नाही. मुलगा सवाई सिंग याने सांगितले की, त्यांना सरकारकडून कोणतीही जमीन मिळाली नाही. आर्थिक फायदाही झाला नाही. शेवटच्या काळात त्यांना 12000 रुपये मासिक पेन्शन मिळत होते.