महाराष्ट्र

maharashtra

New Coronavirus : ब्रिटनहून आलेले १९ प्रवासी पाटण्यातून पसार

By

Published : Jan 5, 2021, 10:07 AM IST

ब्रिटनहून भारतात परतलेले १९ प्रवासी पाटण्यातून पसार झाले आहेत. पोलीस आणि प्रशासनाकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, मोबाईल बंद करून हे सर्व प्रवासी घरातून बाहेर निघून गेले आहेत.

file pic
संग्रहित छायाचित्र

पाटणा - ब्रिटनहून परतलेले १९ प्रवासी पाटण्यातून पसार झाले आहेत. पोलीस आणि प्रशासनाकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, मोबाईल बंद करून हे सर्व प्रवासी घरातून बाहेर निघून गेले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. त्यामुळे परदेशातून आलेल्या नागरिकांना अलगीकरणात ठेवण्यात येत आहे. मात्र, तरीही काही प्रवासी पळून जात आहेत.

क्वारंटाईन करण्यासाठी गेले असताना पसार -

नोव्हेंबर २३ ते ३१ डिसेंबर दरम्यान ब्रिटनहून भारतात आलेल्या प्रवाशांची यादी पाटणा विमानतळ प्रशासनाने दिली आहे. या नागरिकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक पालिकेचे अधिकारी घरी गेले असता यातील १९ प्रवासी घरामध्ये आढळून आले नाहीत. या प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी अधिकारी गेले होते. मात्र, मोकळे हात हलवत माघारी यावे लागले. या प्रवाशांचे मोबाईल फोनही बंद आहेत. त्यामुळे त्यांचा शोध घेणं मुश्किल होऊन बसल्याचं पाटणा सरकारी रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक विभा कुमारी यांनी सांगितले.

आपत्ती निवारण कायद्यांतर्गत होणार कारवाई-

सध्या नव्या कोरोना विषाणूने ब्रिटनमध्ये थैमान घातले असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी पुन्हा कठोर लॉकडाऊन जाहीर केला आहे. नवा कोरोना विषाणू पहिल्यापेक्षा जास्त संसर्गजन्य असून खबरदारी घेण्याचे आवाहन सरकारने प्रशासनाला केले आहे. भारतातही नव्या कोरोचे रुग्ण सापडले असून त्यांच्यावर सरकारी विलगीकरणात उपचार सुरू आहेत. फरार झालेल्या प्रवाशांवर आपत्ती निवारण आणि महामारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांचे पासपोर्टही रद्द करण्यात यावे यासाठी आम्ही अधिकृत प्राधिकरणाकडे शिफारस करणार आहोत, असे विभा कुमारी म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details