नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात गेल्या सहा वर्षांत तेरा दिवसात एका गुन्हेगाराचा पोलीस चकमकीत खात्मा करण्यात आला आहे. 20 मार्च 2017 ते 6 मार्च 2023 या कालावधीत झालेल्या चकमकींनंतर पोलिसांनी 23 हजरा 69 गुन्हेगारांना अटक केली होती. त्यापैकी 4 हजार 911 जण चकमकीत जखमी झाले होते. एडीजी (कायदा सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले की आतापर्यंत गोळीबारात 15 पोलिसांचाही मृत्यू झाला आहे. तर आणखी 1 हजार 424 पोलिस गोळीबारात जखमी झाले. यूपी पोलिसांनुसार, 2017 मध्ये 28, 2018 मध्ये 41, 2019 मध्ये 34, 2020 - 2021 मध्ये प्रत्येकी 26, 2022 मध्ये 14 गुन्हेगारांना पोलिसांन यमसदनी पाठवले आहे.
कुख्यात गुंड रोहित सांडू ठार :28 जून 2019 रोजी, 23 वर्षांपासून फरार असलेल्या दोन वाँटेड गुन्हेगारांना बाराबंकी येथे एका चकमकीत पोलिसांनी गोळ्या घातल्या होत्या. त्यांनी बँक लुटण्याची योजना आखली होती. जुबेर (48), लोमास (46), दोघेही सीतापूरचे मूळ रहिवासी होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. त्यांच्यावर 50 हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. या दोघांनीही किमान 110 गुन्हे केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 16 जुलै 2019 रोजी मेरठ आणि मुझफ्फरनगरच्या पोलिस पथकांनी पश्चिम यूपीचा कुख्यात गुंड रोहित सांडू आणि त्याच्या तीन जवळच्या साथीदारांना चार तासांच्या आत दोन वेगवेगळ्या चकमकीत ठार केले होते.