ग्वालियर –एका 16 वर्षीय युवकाने रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ग्वालियर शहरात घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून आपण टोकाचे पाऊल का उचलतो आहे, याचा खुलासादेखील केला आहे. तसेच या चिठ्ठीत त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देखील उल्लेख केला आहे.
मृतदेहाजवळ आढळली सुसाईट नोट -
ग्वालियर शहरातील ११ वीत शिकणाऱ्या युवकाने रविवारी रात्री चालत्या रेल्वे खालीउडी मारून आत्महत्या केली आहे. या युवकाच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट देखील आढळून आली आहे. ज्यातप त्याने आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. 'मी एक चांगला डान्सर बनू शकलो नाही, कारण माझ्या कुटुंबाने आणि मित्रांनी मला साथ दिली नाही, असे त्याने चिठ्ठीत लिहीले आहे. तसेच त्याने या चिठ्ठीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचादेखील उल्लेख केला आहे. गायक अरिजीत सिंह आणि सुशांत खत्री यांनी कोरियाग्रोफ केलेला डान्सचा म्युझिक व्हिडीओ बनवला जावा, अशी माझी शेवटी इच्छा असून ती मोदींजींनी पूर्ण करावी, असे त्याने चिठ्ठीत म्हटले आहे.
हेही वाचा - राज्यपालांच्या उपस्थितीत गडचिरोलीतून सीआरपीएफची सायकल रॅलीस प्रारंभ, रश्मी शुक्लांची होती उपस्थिती