नवी दिल्ली:मालवाहू जहाजातील सोळा भारतीय क्रू मेंबर्स इक्वेटोरियल गिनी आणि नायजेरियामध्ये नऊ महिन्यांहून अधिक काळ अटकेत होती. नायजेरियातील संबंधित अधिकाऱ्यांशी सरकारने प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला.
एमटी हेरॉईक इडून या तेल टँकरवर २६ क्रू मेंबर ऑगस्टपासून अडले होते. त्यामध्ये १६ भारतीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना इक्वेटोरियल गिनी आणि त्यानंतर नायजेरिया पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. या कर्मचाऱ्यांवर तेल चोरीसह चाचेगिरीचे आरोप आहेत. केंद्र सरकारने नायजेरिया सरकारशी चर्चा केल्यानंतर क्रूमधील सर्वांवरील आरोप हटविण्यात आले आहेत. . सूत्रांनी सांगितले की भारतीयांची सूटका करण्यासाठी अधिकारी जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहिले. तसेच नायजेरियाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या संपर्कातदेखील राहिले.
भारताच्या दबावापुढे झुकले नायजेरिया सरकार:भारत सरकारने इक्वेटोरियल गिनी आणि नायजेरियातील द्विपक्षीय बैठका घेतल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे कर्मचाऱ्यांच्या सुटकेची मागणी केली. भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी नायजेरियावर राजनैतिक दबाव टाकला.त्यानंतर नायरेजिया सरकारने जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्यांची गांभीर्याने दखल घेण्यास सुरुवात केली. त्या भारतीयांना जहाजावर राहण्याची परवानगी देत जेवण्याची सोयदेखील केली. कुटुंबियांशी संपर्क करण्याची परवानगी दिली. केंद्रात नेण्याऐवजी नियमित जेवणाची तरतूद करून जहाजावर राहण्याची परवानगी देण्यात आली. क्रू मेंबर्सनाही त्यांच्या कुटुंबीयांशी वेळोवेळी संपर्क करण्याची परवानगी देण्यात आली होती.भारत सरकारने क्रूला कायदेशीर मदत मिळण्यासाठी शिपिंग कंपनीची मदत घेतली आहे. भारत सरकारच्या दबावानंतर नायजेरियाच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही तेल चोरीला गेले नसल्याचे सांगितले.
भारत सरकारने मदत केल्याने सुटका झाली. त्याबद्दल मी भारत सरकार व केरळ सरकारचा आभारी आहे. कुटुंबात आल्याने मी खूप आनंदी आहे-खलाशी सानू जोस
मायदेशी परतल्याने आनंद:निवारी रात्री केरळच्या कोची विमानतळावर पोहोचल्यावर क्रूमधील भारतीय कर्मचाऱ्यांचे कुटुंबियांनी व भारतीय अधिकाऱ्यांनी फुलांच्या हारांनी स्वागत केले.कुटुंबीयांनी आणि भारतीय अधिकाऱ्यांनी फुलांच्या हारांनी स्वागत केले. सुटका झालेल्या खलाशांपैकी एक असलेल्या सानू जोसने केरळमध्ये पोहोचल्यानंतर आनंद व्यक्त केला. हा कर्मचारी म्हणाला, की नायजेरियात अटक झाल्यानंतर भविष्यात काय होईल, याची खात्री नव्हती. जीवाची खूप भीती वाटत होती.