कलबुर्गी (कर्नाटक ) - देशभरात कोरोनाचा प्रसार झाला असून देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून कोरोना रुग्णांचा आकडा हा तब्बल एक कोटीवर पोहोचला आहे. शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता पाऊल उचललं जात आहेत. यातच कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये एका शासकीय शाळेतील 22 पैकी 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
कलबुर्गीमध्ये एकाच शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण - Kalaburagi corona update
शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता पाऊल उचललं जात आहेत. यातच कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये एका शासकीय शाळेतील 22 पैकी 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
कोरोनाची लागण झालेले विद्यार्थी हे कलागी भागातील रहिवासी आहेत. त्यांची प्रकृती जास्त गंभीर नसल्याने सर्व विद्यार्थ्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. खबरदारी म्हणून, तहसीलदार अधिकाऱ्याने येत्या सोमवारपर्यंत शाळेला सुट्टी दिली आहे.
कलागी भागात एक लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अनेक मुंबईमधील काही लोकांनी या लग्नात उपस्थितील लावली होती. या लग्नात शाळेतील दोन विद्यार्थीही गेले होते. त्यामुळे दोन विद्यार्थ्यांमार्फत इतरांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप शाळेतील 41 विद्यार्थ्यांच्या चाचणीचा अहवाल येणे बाकी आहे.