छत्तीसगढ ( बिलासपूर ) : (road accident in bilaspur) हिमाचलमध्ये रस्ते अपघाताच्या घटना समोर येत आहेत. बिलासपूर शहराला लागून असलेल्या बामटा चौकाजवळ एक खासगी व्होल्वो बस उलटली. बस मनालीहून चंदीगडच्या दिशेने जात होती, त्यावेळी बिलासपूरजवळ येताच एका तीव्र वळणावर बस उलटली. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये 40 जण होते, त्यापैकी 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेतून बिलासपूरच्या जिल्हा रुग्णालयात ( Bilaspur District Hospital ) उपचारासाठी आणले जात आहे. (Bus accident in bilaspur)
Road Accident : हिमाचलमध्ये खासगी बस उलटली, १५ जण जखमी - Bilaspur District Hospital
बिलासपूर शहरातील बामटा चौकाजवळ एक खासगी व्होल्वो बस उलटली. या अपघातात 15 जण गंभीर जखमी झाले. बसमध्ये 40 जण होते. जखमींना उपचारासाठी बिलासपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल ( Bilaspur District Hospital ) करण्यात आले आहे. (Bus accident in bilaspur) (road accident in bilaspur)

धुक्यामुळे अपघात :घटनेची माहिती मिळताच बिलासपूर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताचे कारण शोधले जात आहे. बिलासपूरमध्ये सकाळी जास्त धुके होते, धुक्यामुळे समोरचे दिसने कमी झाल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहेत. (private Volvo bus overturned in Bilaspur ) (Road Accident in Himachal) (Bilaspur Bus Accident Latest News)
रुग्णालयात उपचार सुरू : इतर जखमींवर बिलासपूरच्या प्रादेशिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस मनालीहून परतत होती. मात्र, तपासानंतरच नेमकी कारणे समजू शकतील. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक जमा झाले, त्यांनी पोलिसांनाही माहिती दिली. प्रकरणाचा तपास सुरू आहे.