महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

15 नोव्हेंबर top news : आज कार्तिकी एकादशी, बिरसा मुंडा यांची जयंती; टॉप न्यूज वाचा एका क्लिकवर - 15 November 2021

आज (15 नोव्हेंबर) आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

15-november-top-news-today-is-karthiki-ekadashi-birsa-mundas-birthday
15 नोव्हेंबर top news : आज कार्तिकी एकादशी, बिरसा मुंडा यांची जयंती; टॉप न्यूज वाचा एका क्लिकवर

By

Published : Nov 15, 2021, 6:09 AM IST

आज 'या' बातम्यांवर असेल नजर -

  • आज कार्तिकी एकादशी

आज कार्तिकी एकादशी आहे. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने कार्तिकी यात्रा (प्रबोधिनी भागवत एकादशी) निमीत्त विठ्ठल व रूक्मिणीमाता गाभारा, नामदेव पायरी, विठ्ठल सभामंडप, रूक्मिणीमाता सभामंडप येथे आकर्षक व मनमोहक अशी रंगीबेरंगी फुलाची आरास करण्यात आली आहे. सविस्तर वाचा, पाहा व्हिडिओ.

  • बिरसा मुंडा यांची जयंती -

आज बिरसा मुंडा यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने 15नोव्हेंबर हा दिवस आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.

कालच्या महत्त्वाच्या बातम्या -

  • पंढरपूर - कार्तिकीचा सोहळा। चला जाऊं पाहूं डोळां। आले वैकुंठ जवळां। सन्निध पंढरीये, या संत तुकारामाच्या अभंगाच्या ओळी प्रमाणे, आज पंढरपूर (pandharpur) येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर (Vitthal Rukmini Temple) समितीच्यावतीने कार्तिकी यात्रे (Karthiki Yatra) निमित्त विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या मंदिरात आकर्षक व मनमोहक अशी रंगीबेरंगी फुलाची आरास (beautiful decoration in Vitthal rukmini temple) करण्यात आली आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर अधिकच खुलून दिसत होते. दोन वर्षानंतर कार्तिक यात्रा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी भाविकांनी पंढरपूर गजबजून गेले आहे. आजची सजावट पुण्याचे भाविक राम जांभुळकर ह्यांच्याकडून करण्यात आली. विठ्ठल व रुक्मिणी मंदिर गाभारा, नामदेव पायरी, विठ्ठल सभामंडप, रूक्मिणीमाता सभामंडप झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. सविस्तर वाचा...
  • पुणे - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत चिंताजनक असल्याच सांगितलं जातं आहे. सविस्तर वाचा..
  • वर्धा - जिल्ह्यातील करंजी येथे काँग्रेसच्यावतीने जनजागरण अभियानाचा (Congress Janjagaran Abhiyan) शुभारंभ करण्यात आला. सेवाग्राम (Sevagram) लगतच्या करंजी (भोगे) या गावात जनजागृती अभियान अंतर्गत कार्यक्रमाला काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole), आमदार रणजित कांबळे (MLA Ranjit Kamble) उपस्थित होते. यावेळी नेत्यांनी पंक्तीत बसून गावकऱ्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला. के सी वेणूगोपाल, एच. के. पाटील, नाना पटोले यांनी करंजी येथे मुक्काम केला. सविस्तर वाचा...
  • औरंगाबाद -पेट्रोलच्या किमती अमेरिकेत ठरवल्या जातात असे अजब वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. हा देश केंद्र सरकारच्या पैशावर चालत आहे. अमेरिकेत पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याने केंद्राला दोष दिला जात आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढवायचे काम केंद्र सरकार करत नाही. भाजपाला पेट्रोल डिझेलच्या भावाढीवर दोष देणे योग्य नाही असा नवा खुलासा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांनी केला आहे. यावेळी बोलत असताना ते म्हणाले की, जर कोणीही कुमेढेवाडी असो, वा कोणत्याही झोपडपट्टीला पाडण्यासाठी येथील आधिकारी-पदाधिकाऱ्यांनी यावे, त्यांचे रस्त्यावर फिरणे हे बंद करू असेही ते बोलताना म्हणाले. सविस्तर वाचा...
  • पुणे - कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने जे काही वक्तव्य केले आहे, ते बरोबर आहे, असे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram gokhale) म्हणाले. स्वतंत्र हे आपल्याला दिले गेलेले आहे. जे स्वतंत्र योद्धा स्वातंत्र्यासाठी लढत होते, ते जेव्हा फाशीवर चढत होते तेव्हा त्याकाळचे मोठ्या लोकांनी त्यांना वाचवले नाही आणि ते लोक स्वातंत्र्यानंतर केंद्रीय मंत्री झाले, असे देखील यावेळी गोखले म्हणाले. आपण कोणत्याही पक्षाशी, राजकारण्याशी संबंधित नाही असे ते म्हणाले, मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi)च्या कामाचे कौतुक करत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. सविस्तर वाचा...

जाणून घ्या आजचे राशीभविष्य-

ABOUT THE AUTHOR

...view details