महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Lal Bahadur Shastri Death anniversary 2023 : भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या 15 प्रेरणादायी घोषणा

लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांनी भारतात श्वेतक्रांती आणि हरितक्रांती प्रसारित ( White Revolution and Green Revolution in India ) केली. त्यामुळे देशात दूध पुरवठा आणि अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली. माजी पंतप्रधान (Indias Second Prime Minister) लाल बहादूर शास्त्री यांची 11 जानेवारी रोजी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या काही प्रेरणादायी कार्यांवर (15 inspirational declaration) नजर (Lal Bahadur Shastri Death anniversary 2023 ) टाकूयात.

Lal Bahadur Shastri Death anniversary 2023
लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी

By

Published : Dec 25, 2022, 2:07 PM IST

Updated : Jan 11, 2023, 6:39 AM IST

लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान (Indias Second Prime Minister) होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोंबर रोजी झाला. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५ सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हिएत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हिएत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी विषप्रयोग (Lal Bahadur Shastri Death anniversary 2023) झाल्यामुळे मृत्यू झाला.

लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रेरणादायी घोषणांवर(15 inspirational declaration) नजर टाकूयात :1.जय जवान, जय किसान, 2. आपण युद्धात लढतो तसे धैर्याने शांततेसाठी लढले पाहिजे. 3.खरी लोकशाही किंवा जनतेचे स्वराज्य असत्य आणि हिंसक मार्गाने कधीच येऊ शकत नाही . 4. 4. आम्ही केवळ आपल्यासाठीच नाही तर जगभरातील लोकांसाठी शांतता आणि शांततापूर्ण विकासावर विश्वास ठेवतो. 5. आपल्या सामर्थ्यासाठी आणि स्थिरतेसाठी आपल्या लोकांची एकता वाढवण्याच्या कार्यापेक्षा कोणतेही महत्त्वाचे कार्य नाही.

6. स्वातंत्र्य टिकवणे हे एकट्या सैनिकांचे काम नाही. संपूर्ण राष्ट्राचे काम आहे. त्याासाठी राष्ट्र बलवान झाला पाहिजे. 7. आर्थिक समस्या आपल्यासाठी सर्वात महत्त्वाच्या आहेत. आपल्या सर्वात मोठ्या शत्रूंशी - गरिबी आणि बेरोजगारी यांच्याशी लढा देणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. 8. विज्ञान आणि वैज्ञानिक कार्यात यश अमर्यादित किंवा मोठ्या संसाधनांच्या तरतुदीद्वारे नाही तर समस्या आणि उद्दिष्टांच्या सुज्ञ आणि काळजीपूर्वक निवडण्यात येते. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक आहे. 9. शिस्त आणि एकत्रित कृती हेच राष्ट्रासाठी शक्तीचे खरे स्रोत आहेत.". आपल्या देशाची खास गोष्ट म्हणजे आपल्याकडे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी आणि इतर सर्व धर्माचे लोक आहेत. आपल्याकडे मंदिरे आणि मशिदी, गुरुद्वारा आणि चर्च आहेत. पण आम्ही हे सगळे राजकारणात आणत नाही... हा भारत आणि पाकिस्तानमधील फरक आहे.

11. शिस्त आणि एकत्रित कृती हेच राष्ट्रासाठी शक्तीचे खरे स्रोत आहेत. 12. ज्याला कोणत्याही प्रकारे अस्पृश्य म्हणता येईल अशी एकही व्यक्ती उरली तर भारताला शरमेने मान खाली घालावी लागेल. 13. आज अण्वस्त्रे बनवण्यासाठी अणुऊर्जेचा वापर केला जात आहे, हे सर्वात खेदजनक आहे. 14. शासनाची मूळ कल्पना, जशी मी पाहतो, ती म्हणजे समाजाला एकत्र बांधून ठेवणे, जेणेकरून तो विकास करू शकेल आणि विशिष्ट ध्येयांकडे कूच करू शकेल. 15. देशासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक आहे.

Last Updated : Jan 11, 2023, 6:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details