महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

2000 Note Ban : 8 दिवसांत जमा झाले 'इतके' कोटी रुपये, SBI च्या चेअरमनचा खुलासा - SBI

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे रोजी 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. बँकांमध्ये 23 मे पासून नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज 30 मे रोजी नोटा बंदीला एक आठवडा झाला आहे. या सात दिवसांत बँकांमध्ये किती 2000 रुपयांच्या नोटा जमा झाल्या आणि किती नोटा बदलल्या, बँकांमध्ये गर्दी आहे की नाही, जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये…

2000 Not Ban
2000 Not Ban

By

Published : May 30, 2023, 4:51 PM IST

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक SBI ने एका आठवड्यात बँकांमध्ये किती 2000 रुपयांच्या नोटा जमा झाल्या आहेत याची माहिती दिली आहे. एसबीआयचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी सांगितले की, आतापर्यंत एसबीआयच्या सर्व शाखा, डिपॉझिट मशीनमधून 2000 रुपयांच्या 14 हजार कोटी रुपयांच्या नोटा जमा करण्यात आल्या आहेत. दिनेश कुमार खारा यांनी गांधीनगर येथील GIFT-IFSC येथे SBI च्या परकीय चलन बाँड सूचीकरण समारंभात ही माहिती दिली.

3 हजार कोटी नोटा बदलण्यात आल्या : मीडिया रिपोर्ट्सनुसार, खारा म्हणाले की, 14 हजार कोटी रुपयांच्या 2 हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यात आल्या आहेत. बँकांच्या सर्व शाखांमध्ये एकूण 3000 कोटी रुपये बदलण्यात आले आहेत. अशाप्रकारे, बाजारातील सर्व 2000 रुपयांच्या नोटांपैकी 20 टक्के नोटा एसबीआयकडे आल्या आहेत. RBI च्या वार्षिक अहवालानुसार, 31 मार्च 2022 पर्यंत, 2000 रुपयांच्या एकूण 214.20 कोटी नोटा चलनात आहेत. ज्या एकूण नोटांच्या 1.6 टक्के आहे. दुसरीकडे, मूल्याच्या बाबतीत, 4 लाख 28 हजार 394 कोटी रुपयांच्या नोटा चलनात आहेत.

2 हजारांची नोट 2016 पासून चलनात : आरबीआयने 19 मे रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढण्याची घोषणा केली होती. मात्र, यासाठी मध्यवर्ती बँकेने नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. म्हणजेच तोपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा कायदेशीर टेंडरमध्ये राहतील. 23 मे पासून नोटाबंदीची प्रक्रिया सुरू होऊन आज 30 सप्टेंबरला एक आठवडा झाला आहे. 2016 च्या नोटाबंदीनंतर बाजारात 2000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या होत्या. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांऐवजी सरकारने 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या.

नोट बदलण्यासाठी गर्दी नाही : काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी सरकारने 2000 रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या होत्या. पण ही नोट लोकांमध्ये व्यवहारात फारशी वापरली जात नव्हती, म्हणजेच लोकांमध्ये ती कमी लोकप्रिय होती. या पार्श्वभूमीवर आता आरबीआयने क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत या नोटांना माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये फारशी गर्दी नाही. नोटा बदलण्यासाठी दिलेला वेळ हे यामागे कारण असण्याची शक्याता नाकारता येत नाही.

हेही वाचा -Ban on 2000 notes : तुमच्याकडेही असेल 2 हजाराची नोट, तर काय कराल शेठ; जाणून घ्या नोट बदलीची प्रक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details