आज 'या' बातम्यांवर असेल नजर -
- पंडित नेहरू यांची जयंती -
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आज 132वी जयंती आहे. त्यांची जयंती राष्ट्रीय बालदिन म्हणून साजरी करण्यात येते. - आजपासून कॉंग्रेसचे जनजागरण अभियान -
आजपासून कॉंग्रेसचे जनजागरण अभियान सुरू करण्यात आले आहे. मुंबईत काँग्रेसतर्फे आज (रविवार) दुपारी २ वाजता राजगृह (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान) ते चैत्यभूमी, दादर येथे भाववाढ, वाढती महागाई, बेरोजगारी, केंद्र सरकारची निष्क्रियता या विरोधात पदयात्रा काढण्यात येणार आहे. - मध्य रेल्लेचा मेगा ब्लॉक -
मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी - विद्याविहार यामार्गावरील गाड्या सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत धिम्या मार्गावर तर कुर्ला - वाशी कडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्या ह्या सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत हार्बल मार्गावर चालणार आहेत. - आज जागतिक मधुमेह दिवस
दरवर्षी दिनांक १४नोव्हेंबर हा दिवस जगभरात जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा केला जातो. मधुमेह हा दीर्घकालीन आजार असून तो बळावला तर आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. कोणत्याही विशिष्ट वयोगटापर्यंत सीमित न राहता हा आजार आता सर्व वयोगटात आढळत आहे. त्यांची जनजागृती व्हावी यानिमित्ताने हा दिवस साजरा केला जातो. सविस्तर वाचा, मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेली माहिती...
कालच्या महत्त्वाच्या बातम्या -
- गडचिरोली -धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात शनिवारी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक(Naxals killed in encounter in Gadchiroli forest) झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांच्या एका मोठ्या नेत्यासह 26 नक्षलवादी(26 Naxals killed) ठार झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल(Gadchiroli SP Ankit Goel) यांनी दिली आहे. या चकमकीत चार पोलीस(Four Police Jawans Injured) जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. या चकमकीत नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडे(Milind Teltumbde) ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या वृत्ताला पोलीस विभागामार्फत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सविस्तर वाचा...
- अकोला - येथील सौम्या गुप्ता (Soumya Gupta) या नऊ वर्षाच्या चिमुकलीने वडिलांच्या मार्गदर्शनात सितारवादनाला सुरूवात केली. चिमुकल्या सौम्याला लंडनच्या 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'चा (World Book of Records) जगातील सर्वात लहान 'सितारवादका'चा (youngest sitar player in world) बहुमान मिळाला आहे. तिने हे यश अल्पावधीतच गाठले आहे. या यशाबद्दल तिच्याशी बालक दिनानिमित्त संवाद साधला 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी जीवन सोनटक्के यांनी... सविस्तर वाचा...
- मुंबई - “मधुमेह (Diabetes) टाळण्यासाठी आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा (Healthy lifestyle) अंगिकार करा. यामध्ये प्रामुख्याने नियमित व वेळेवर सुयोग्य आहार घेणे, मार्गदर्शकांच्या सल्ल्यानुसार दररोज ठरलेल्या वेळी व्यायाम करणे, पायी चालणे, सायकल चालविणे यासह पुरेशी झोप घेणे, यासारख्या बाबींचा समावेश वैद्यकीय सल्ल्यानुसार करावा. त्याचबरोबर ३० वर्षावरील सर्वांनी वर्षातून किमान एकदा आपली मधुमेह चाचणी करवून घ्यावी”, असे मार्गदर्शन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी (Additional Commissioner Suresh Kakani) यांनी केले. सविस्तर वाचा...
- रत्नागिरी (ratnagiri) - त्रिपुरा हिंसाचाराच्या (Tripura violence) पार्श्वभूमीवर उठणाऱ्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. अफवा पसरवण्याचे काम काही जणांकडून केले जात आहे. त्यामध्ये काही राजकीय मंडळी असल्याचा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत (ShivSena MP Vinayak Raut) यांनी अमरावतीच्या घटनेबाबत (Amravati Violence) केला आहे. ते शनिवारी रत्नागिरीत बोलत होते. सविस्तर वाचा...
- पणजी (गोवा) - तृणमूलची धुरा समर्थपणे गोव्यात सांभाळणारे लुझिनो फलेरो (Luzino Falero) आता कोलकात्यातील कोट्यातून राज्यसभा खासदार (Rajya Sabha MP) होणार आहे. तसे पत्र तृणमुल काँग्रेसने फलेरो यांना दिले आहे. दरम्यान फलेरो यांची राज्यसभा खासदारकी निश्चित झाल्यावर राज्यातील तृणमूलच्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सविस्तर वाचा...
- ठाणे - कल्याण-मुरबाड महामार्गावर कार आणि अज्ञात बोलेरो पिकअप जीपची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधून प्रवास करीत असलेले उल्हासनगर महापालिकेतील भाजपा नगरसेवक अजित गुप्ता (Corporator Ajit Gupta) हे जागीच ठार झाले. तर त्याच्या मित्र शिवशंकर दत्ता यांचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा अपघात कि घातपात ? अशी चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे कल्याण तालुका पोलिसांनी या अपघाताची सखोल चौकशी करावी अशी मागणी नागरिक करताना दिसत आहे. सविस्तर वाचा...
जाणून घ्या आजचे राशीभविष्य-