महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bank Holiday January 2023 : जानेवारीमध्ये बँका 14 दिवस राहणार बंद; सुट्ट्यांची संपूर्ण यादी पाहा - Rbi Calendar In Marathi

नवीन वर्ष 2023 (Bank Holiday January 2023) च्या पहिल्या महिन्यात, जानेवारीमध्ये अनेक सण आणि वर्धापनदिनांमुळे तब्बल 14 दिवस बँकांना सुट्टी (Rbi Calendar In Marathi) असेल.

Bank Holiday January 2023
जानेवारीत बँका 14 दिवस बंद राहतील

By

Published : Dec 25, 2022, 4:49 PM IST

डिसेंबर 2022 (Bank Holiday January 2023) संपायला अवघे काही दिवस उरले आहे. नवीन वर्ष 2023 सुरू होणार आहे. नवीन वर्ष 2023 च्या पहिल्या महिन्यात, अनेक सण आणि वर्धापन दिनानिमित्त जानेवारीमध्ये अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. RBI ने जानेवारीत बँकांच्या सुट्ट्यांचे कॅलेंडर (Rbi Calendar In Marathi) जारी केले आहे. RBI नुसार जानेवारी 2023 मध्ये बँकांमध्ये 14 दिवस सुट्टी असेल. त्यामुळे तुम्हाला बँकेशी संबंधित कामांसाठी आतापासूनच नियोजन करावे लागेल.

5 रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने जानेवारी 2023 साठी बँकिंग सुट्ट्यांसाठी सुट्टीचे कॅलेंडर जारी केले आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार जानेवारीमध्ये एकूण 14 सुट्ट्या असतील आणि या दिवसांमध्ये बँकांना सुट्ट्या असतील. या सुट्ट्यांच्या यादीमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसेच 5 रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे.

जानेवारीतील सण आणि दिवस :नवीन वर्ष, गुरु गोविंद सिंग जयंती, मिशनरी डे, स्वामी विवेकानंद जयंती, मकर संक्रांती, पोंगल, प्रजासत्ताक दिन इत्यादी जानेवारीमध्ये काही महत्त्वाचे सण आहेत. लक्षात घ्या की या सर्व दिवशी सर्व राज्यांमध्ये बँका बंद राहणार नाहीत. या सुट्ट्या बँकिंग क्षेत्रानुसार असतील.

2023 मधील सुट्ट्यांची संपूर्ण यादी :1 जानेवारी: नवीन वर्षाचा दिवस (सर्व राज्यांमध्ये) (रविवार), ५ जानेवारी: गुरु गोविंद सिंग जयंती, 8 जानेवारी: रविवार (सर्व राज्यांमध्ये), 11 जानेवारी: मिशनरी डे (फक्त मिझोराम), 12 जानेवारी : स्वामी विवेकानंद जयंती, 14 जानेवारी: मकर संक्रांती (दुसरा शनिवार), 15 जानेवारी: पोंगल / माघ बिहू (रविवार), 22 जानेवारी: सोनम लोसार (फक्त सिक्कीम) (रविवार), 23 जानेवारी : नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, 25 जानेवारी: राज्यत्व दिन (हिमाचल प्रदेश), २६ जानेवारी: प्रजासत्ताक दिन (सर्व राज्यांमध्ये), 28 जानेवारी: चौथा शनिवार (सर्व राज्यांमध्ये), 29 जानेवारी: रविवार (सर्व राज्यांमध्ये), ३१ जानेवारी: मॅडम मेफी (फक्त आसाम). 14 Bank Holidays In January 2023

ABOUT THE AUTHOR

...view details