महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भीषण अपघात! फुटपाथवर झोपलेल्या 15 मजुरांना ट्रकने चिरडले - Gujrat accident news

सुरतमध्ये फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना ट्रकने चिरडले आहे. त्यात १५ जण जागेवरच ठार झाले आहेत.

accident
सुरत अपघात

By

Published : Jan 19, 2021, 7:41 AM IST

Updated : Jan 19, 2021, 8:58 AM IST

सुरत (गुजरात ) :गुजरातमधील सुरतमध्ये आज ( मंगळवारी) पहाटे एक भीषण अपघात झाला. यात भरधाव ट्रकने रस्त्या शेजारी फुटपाथवर झोपलेल्या १५ मजूरांना चिरडले. त्यात सर्वच जण जागेवरच ठार झाले. सुरतमधील मांडवी रोडवर हा अपघात झाला. ट्रक चालकाने गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. ठार झालेले मजूर हे राजस्थानचे आहेत. ८ जखमींना जवळच्याच स्मीमेर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

असा झाला अपघात

ट्रकचालक भरधाव वेगाने चालला होता. त्याच वेळी ऊसाने भरलेला टेम्पो समोर आला. त्याला धडक दिल्यानंतर ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर हा ट्रक रस्त्या शेजारी फुटपाथवर झोपलेल्या मजुरांवर चढला. त्यात १५ जण जागीच ठार झाले. घटनेनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ट्रक चालकला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ठार मजूर राजस्थानचे

प्राथमिक माहिती नुसार ठार झालेले सर्व जण मजूर होते. ते राजस्थानचे असल्याचेही समोर आले आहे. या अपघातात महिला आणि लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे. तर एक सहा महिन्याची मुलगी आश्चर्यजनक वाचली आहे. तीला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघातात फुटपाथ शेजारील चार ते पाच दुकानांचेही नुकसान झाले आहे.

हेही वाचा - मांत्रिकाचा एकाच कुटुंबातील तीन महिलांसह मुलीवर बलात्कार, नागपुरातील घटना

हेही वाचा - मुंबईत लसीकरण पुन्हा सुरू, आठवड्यातून चार दिवस लसीकरण

Last Updated : Jan 19, 2021, 8:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details