पाटणा :बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने मृत्यूची प्रकरणे सुरूच आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत बनावट दारूमुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, गेल्या चार दिवसांत मधेपुरामध्ये दोन, गयामध्ये चार जणांचा मृत्यू झाला ( 13 died due to Spurious liquor in Bihar ) आहे. एकीकडे नातेवाईक दारू पिऊन मृत्यू झाल्याची कबुली देत असताना दुसरीकडे या मृत्यूंनंतर पोलीस प्रशासनाने अवैध दारूविरोधात मोहीम राबवून छापे टाकण्यास सुरुवात केली ( Spurious liquor in Bihar ) आहे.
औरंगाबादमध्ये विषारी दारूमुळे 11 जणांचा मृत्यू : औरंगाबादमध्ये कथित दारूमुळे मंगळवारी तीन जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आणि स्थानिक चौकीदाराला निलंबित करण्यात आले आहे. यानंतर हा आकडा 11 वर पोहोचला. मदनपूर ब्लॉकच्या खिरियावान गावात 24 तासांत 7 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये स्वत: जिल्हा दंडाधिकारी सौरभ जोरवाल यांनी विषारी दारूमुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.
औरंगाबाद विषारी दारू प्रकरणावर मंत्री काय म्हणाले : दरम्यान, दारूबंदी मंत्री सुनील कुमार म्हणाले की, औरंगाबादमध्ये विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूबाबत पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. प्रथम तीन आणि नंतर 2 म्हणजे एकूण 5 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. सुनील कुमार म्हणाले की, आम्ही पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहोत.