महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत-चीनमधील कॉर्पस कंमाडर पातळीवरील चर्चा विधायक - भारत चीन सैन्यदल चर्चा

भारत आणि चीनच्या सैन्यदलामध्ये चुशूल-मोल्डी सीमारेषेवर बैठक झाली. चीन आणि भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची 14 जुलैला डुशान्बे येथे बैठक झाली होती. तर वर्किंग मेकॅनिझम फॉर कन्सल्टेशन अँड कोऑर्डिनेशनची भारत-चीन सीमा व्यवहारावर 25 जूनला बैठक झाली होती.

India china relation
India china relation

By

Published : Aug 2, 2021, 8:36 PM IST

नवी दिल्ली - भारत-चीनमधील सैन्यदलामध्ये चर्चेची 12 वी फेरी झाली. ही चर्चेची फेरी विधायक झाल्याचे भारताच्या बाजूने विधायक झाल्याचे दोन्ही देशांच्या संयुक्त निवदेनात म्हटले आहे.

भारत-चीन दोन्ही देशांमधील बैठक ही परस्पर सामजंस्याची होती. दोन्ही देशांनी पूर्वसंमतीने आणि प्रोटोकॉलप्रमाणे उर्वरित वाद त्वरित सोडवावेत, असे दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. प्रामाणिक आणि सखोल दृष्टीकोनाची देवाण-घेवाण झाली आहे. दोन्ही देश सीमारेषेवर स्थिरता, शांतता आणि समानता टिकविण्यासाठी परिणामकारक प्रयत्न सुरुच ठेवणार असल्याचे संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा-#JeendeDo गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर सर्वचस्तरातून टीका, जाणून घ्या, प्रतिक्रिया

फेब्रुवारीनंतर भारत-चीनमधील तणाव निवळण्यास सुरुवात-

भारत आणि चीनच्या सैन्यदलामध्ये चुशूल-मोल्डी सीमारेषेवर बैठक झाली. चीन आणि भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची 14 जुलैला डुशान्बे येथे बैठक झाली होती. तर वर्किंग मेकॅनिझम फॉर कन्सल्टेशन अँड कोऑर्डिनेशनची भारत-चीन सीमा व्यवहारावर 25 जूनला बैठक झाली होती. फेब्रुवारीनंतर दुसऱ्या टप्प्यात पॅनगाँग त्सो जलाशयाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरून सैनिक मागे परतले होते.

हेही वाचा-एल्गार परिषद प्रकरण : उच्च न्यायालयात NIA कडून पुण्याच्या सत्र न्यायालयाच्या 'त्या' निकालाचा बचाव

पँगाँग सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर सीमेवरून भारत आणि चीनचे सैन्य पूर्णपणे मागे हटले आहे. मात्र, तरीही इतर अनेक मुद्दे वादाचे राहीले आहेत. त्यावर पँगाँग सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर सीमेवरून भारत आणि चीनचे सैन्य पूर्णपणे मागे हटले आहे. मात्र, तरीही इतर अनेक मुद्दे वादाचे राहीले आहेत. त्

भारताचे 15 जून 2020 रोजी 20 जवान शहीद -

15 जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारतीय सैन्यदलाचे 20 जवान शहीद झाले होते. भारत-चीन सैन्यादरम्यानचा गेल्या चार दशकांतील हा सर्वात हिंसक तणाव असल्याचे यानंतर सांगितले गेले. भारताने या घटनेनंतर लगेचच आपले सैनिक शहीद झाल्याची माहिती जारी केली होती. मात्र चीनने याविषयी कसलिही अधिकृत माहिती जारी केलेली नव्हती. मात्र, काळी काळानंतर चीनने आपले जवान ठार झाल्याची कबुली देत जवानांची माहितीही सार्वजनिक केली होती. दरम्यान, 10 फेब्रुवारी रोजी प्रकाशित केलेल्या एका वृत्तात रशियन वृत्तसंस्था टासने गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीत चीनचे 45 जवान ठार झाल्याचे म्हटले होते.

राजनाथ सिंह यांच्या माहितीनुसार....

मागील एक वर्षापासून भारत चीन सीमेवर तणाव सुरू होता. गलवान खोरे, पँगाँग सरोवर भागात दोन्ही देशाचे सैन्य आमनेसामने उभे होते. मात्र, आता सैन्य माघारी जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सीमेवर एप्रिल 2020 नंतर जे काही बांधकाम दोन्ही देशांनी केले असेल ते सर्व काढून टाकण्यात येईल आणि जैसे थे स्थिती आणली जाईल. पूर्वीप्रमाणे चीन त्यांचे सैन्य फिंगर 8 (गस्त पाँईन्ट) पर्यंत मागे घेईल तर भारतीय सैन्य फिंगर 3 जवळ थांबेल. जे काही मुद्दे सीमावादात राहीले आहेत, त्यांच्यावरही चर्चा सुरू आहे. लवकरच त्यावरही तोडगा काढला जाईल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत बोलताना सांगितले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details