राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू सभागृहात विरोधी पक्षाच्या खासदारांनी मंगळवारी घातलेल्या गोंधळाबद्दल बोलताना भावनिक झाले. जेव्हा काही सदस्य टेबलांवर बसले आणि काही टेबलांवर चढले, तेव्हाच या सभागृहाची सर्व पवित्रता नष्ट झाली, असे ते म्हणाले.
Monsoon Session Updates : 127वं संविधान संशोधन विधेयक आज राज्यसभेत मांडणार;अनिश्चित काळपर्यंत लोकसभा तहकूब - लोकसभा
11:10 August 11
राज्यसभेत विरोधी खासदारांनी गोंधळ घातला. सभागृह दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब
11:10 August 11
अनिश्चित काळपर्यंत लोकसभा तहकूब
11:07 August 11
...म्हणून व्यंकय्या नायडू झाले भावूक
10:53 August 11
Monsoon Session Updates : 127वं संविधान संशोधन विधेयक आज राज्यसभेत मांडणार
नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि शेवटच्या आठवड्यातील कामकाज सुरू आहे. 19 जुलैपासून सुरू झालेल्या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वादविवाद झाले. लोकसभा आणि राज्यसभेत चर्चेशिवाय अनेक विधेयके मंजूर झाली. लोकसभेत 127 वं संविधान संशोधन बिल मंजूर झाल्यानंतर ते आज राज्यसभेत मांडण्यात येणार आहे.
मंगळवारी लोकसभेत 127 वं संविधान संशोधन बिल मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकाच्या बाजूनं 385 सदस्यांनी मतदान केले. तर विशेष म्हणजे याच्याविरोधात एकही मत पडलं नाही. त्यामुळे हे विधेयक बहुमतानं मंजूर झालं. आज हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. राज्यसभेत हे विधेयक पारित झाल्यानंतर ते राष्ट्रपती महोदयांच्या मंजुरीसाठी पाठवलं जाणार आहे. राष्ट्रपतींच्या सहीनंतर त्याचं कायद्यात रुपांतर होईल.
काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या मुद्द्यावर लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडला आहे. काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी पेगासस मुद्द्यावर लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडला आहे.
विरोधी पक्षांच्या नेत्यांची आज बैठक -
दोन्ही सभागृहांच्या विरोधी पक्षांच्या सभागृह नेत्यांची आज बैठक होणार आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या दालनात ही बैठक होणार आहे. या दरम्यान, विरोधी पक्ष सभागृहातील आजच्या कामकाजासंदर्भात रणनीती बनवतील.
दोन्ही सभागृहांमध्ये सतत होणारा गदारोळ पाहता अहवालानुसार, हे सत्र आजपासून अनिश्चित काळासाठी स्थगित केले जाऊ शकते. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सत्राचा शेवटचा कामकाजाचा दिवस 13 ऑगस्ट आहे.
संसदेचे अधिवेशन 13 ऑगस्टला संपणार -
यंदाचे संसदेचे पावसाळी (मान्सून) अधिवेशन 19 जुलैपासून सुरू झाले आहे. मान्सूनचे अधिवेशन 13 ऑगस्टला संपणार आहे. यामध्ये 19 दिवस कामकाजाचे दिवस असणार असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यापूर्वी दिली होती. कोरोना महामारीत संसदेचे हे दुसरे मान्सून अधिवेशन असणार आहे. सामान्यत: संसदेचे मान्सून अधिवेशन हे जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते. तर स्वातंत्र्यदिनापूर्वी संसदेचे मान्सून अधिवेशन संपते.
हेही वाचा -मॅरेथॉन चर्चेनंतर अखेर 127 व्या घटना दुरुस्तीबाबतचे विधेयक लोकसभेत मंजूर
हेही वाचा - ओबीसी आरक्षणावरून ओवैसी मोदी सरकारला म्हणाले, प्यार किया तो डरना क्या?