हैदराबाद-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित ( 125 foot tall statue of Dr Ambedkar ) तेलंगाणा सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ फूट उंच पुतळा हैदराबादमध्ये उभारण्यात ( tallest statues of Dr Ambedkar ) येणार आहे. अनेक राज्यांमध्ये देशातील महापुरुषांचे उंच पुतळे बसवले जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ फूट उंचीचा पुतळा तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्येही बसविला जात आहे.
2022 च्या अखेरीस तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. हा जगभरातील आंबेडकरांच्या पुतळ्यांपैकी हा सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. हा पुतळा हैदराबाद शहराच्या मध्यभागी असलेल्या हुसेन सागर तलावाजवळ ( Dr Ambedkar statue hussain sagar ) बांधला जात आहे. राज्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र टी रामाराव ( KTR on Dr Ambedkar statue ) यांच्या माहितीनुसार 2022 च्या अखेरीस या पुतळ्याचे अनावरण केले जाईल.
पुतळ्याचे 90 ते 95 टक्के काम पूर्ण-महापालिका प्रशासन आणि नगरविकास मंत्री केटी रामाराव (KTR ) यांनी बुधवारी समाजकल्याण मंत्री कोप्पुला ईस्वार यांच्यासमवेत 150 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या बाबासाहेबांच्या कास्य पुतळ्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. हा पुतळा 50 फुटांच्या कठड्यावर बसविण्यात येणार आहे. केटीआर म्हणाले की, पुतळ्यासाठी पाया तयार करण्याचे 90-95 टक्के काम पूर्ण झाले आहे. हा पुतळा 45 फूट रुंद असणार आहे.
सुमारे 11 एकर जागा पर्यटनासाठी विकसित - पुतळ्याच्या कामात नऊ टन कांस्य आणि १५५ टन स्टेनलेस स्टीलचा वापर केला जाणार आहे. केटी रामाराव (KTR) यांनी सांगितले की डॉ. बी. आर. आंबेडकर पुतळ्याभोवती सुमारे 11 एकर जागा पर्यटनासाठी विकसित केली जाणार आहे. ते केवळ तेलंगणातील लोकांसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान असणार आहे. याशिवाय डॉ.आंबेडकरांचे जीवन व कार्य येथे संग्रहालय, छायाचित्र गॅलरी आणि ग्रंथालयाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्याजवळ ध्यान केंद्र आणि सभामंडपही बांधण्यात येणार आहे. केटीआर म्हणाले की, पुतळ्याच्या बांधकामावर समाजकल्याण मंत्री नियमितपणे देखरेख ठेवत आहेत.